Headlines

जीव धोक्यात:अवैध खासगी बसचा धुमाकूळ; क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, अकोट -अकोला मार्गावरील परिस्थिती, अपघातांची भीती‎




अकोट ते अकोला या मुख्य मार्गावर गेल्या काही दिवसांपासून अवैध खासगी ट्रॅव्हल्स आणि बस वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. अनेक खासगी बस चालक आणि मालकांकडून परिवहन नियमांचे उघडपणे उल्लंघन केले जात असून, प्रवाशांच्या जिवाशी थेट खेळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.चोहोट्टा बाजार आणि देवरी फाटा यांसारख्या प्रमुख थांब्यांवर तर या अवैध वाहनांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर धावणाऱ्या अनेक खासगी बसकडे वैध परवाना नाही. अनेक वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, विमा आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र कालबाह्य झालेली आहेत. असे असतानाही आरटीओ प्रशासनाच्या डोळ्यांदेखत ही वाहने रस्त्यावर धावत आहेत. अधिक नफा कमावण्याच्या हव्यासापोटी बसच्या क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी भरले जातात. अगदी चालकाच्या केबिनमध्ये, इंजिनच्या बोनेटवरही प्रवाशांना बसवले जात असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.याशिवाय, जादा भाडे आकारणीला विरोध करणाऱ्या प्रवाशांसोबत चालकांकडून उद्धट वर्तन आणि दादागिरी करण्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. अनेक खासगी बस चालक आणि मालकांकडून परिवहन नियमांचे उघडपणे उल्लंघन केले जात असून, प्रवाशांच्या जिवाशी थेट खेळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.बेकायदेशीर पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी : या समस्येचा मोठा फटका स्थानिक बाजारपेठ, सर्वसामान्यांना बसत आहे. चोहोट्टा बाजार, देवरी फाटा, गांधीग्राम परिसरातील मुख्य चौक व रस्ते हे या खासगी चालकांनी स्वतःचे अवैध बसस्थानक बनवले आहेत. सरकारी जागांवर, रस्त्याच्या मध्यभागी ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जातात. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते. काय सांगतो मोटार वाहन कायदा? मोटार वाहन कायदा १९८८ नुसार, वैध परवान्याशिवाय प्रवासी वाहतूक करणे आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे हा गंभीर, अजामीनपात्र गुन्हा ठरतो. अशा प्रकरणांमध्ये संबंधित वाहन जप्त करणे, चालकाचा परवाना निलंबित करणे. तसेच मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक ^अकोला परिवहन विभागाने अकोट ते अकोला मार्गावरील लक्झरी वाहनांमधील सीटची तपासणी करावी. अनेक वाहनांच्या सीट खूपच जवळ-जवळ आहेत. कॅबीनमध्ये १० प्रवासी बसवण्यात येतात. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक होत आहे. – सुनील तायडे, प्रवासी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *