![]()
अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील सर्व अकरा आरोपींना येथील विशेष मकोका न्यायालयाने गुरुवारी ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या (मकोका) अंतर्गत पुन्हा अटक केल्यानंतर आरोपींना विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर हजर करण्यात आले. हल्ल्यामागील मूळ कट उघडकीस आणण्यासाठी आरोपींची सखोल कोठडी चौकशी आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी सर्व आरोपींच्या दहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मुंबईतील जुहू परिसरात १८ ऑक्टोबर रोजी टायगरच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्या ११ जणांवर पोलिसांनी मंगळवारी मकोका कायद्याची कलमे लागू केली. सूत्रांनी सांगितले की, टायगरवर हल्ला नेमका कशासाठी केला, कशा पद्धतीने कट रचला गेला, याची माहिती मिळवणे बाकी आहे. ही माहिती हल्लेखोर व त्यांच्या साथीदारांकडून पोलिस कोठडीत वदवून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आरोपपत्र दाखल करण्यास पोलिसांना १८० दिवस मकोका कायद्यानुसार, आरोपी दोषी नाही असे मानण्यास वाजवी कारणे आहेत याची खात्री पटल्यासच न्यायालय जामीन मंजूर करू शकते. या कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना सामान्य फौजदारी कायद्यातील ९० दिवसांऐवजी १८० दिवसांपर्यंतचा कालावधी मिळतो आणि ते आरोपीच्या अधिक कोठडीची मागणीही करू शकतात.
Source link
टायगर श्राॅफ गोळीबार प्रकरण:मूळ कटाचा अजूनही उलगडा झाला नाही, न्यायालयाने ११ आरोपींना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली