Headlines

ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा:नाना पटोले म्हणाले – लोकशाही वाचवण्यासाठी आम्हीही रस्त्यावर उतरणार




मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात देशभरातील विरोधी पक्षांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठे आंदोलन पुकारण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी या मोर्चासाठी इतर विरोधी पक्षांनाही सोबत येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने या आंदोलनात सहभागी होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस रस्त्यावर उतरणार- नाना पटोले काँग्रेस नेते नाना पटोले यांनी माध्यांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “देशातील लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे. उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत जे जनआंदोलन पुकारले आहे, त्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी होतील. दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या केली जात असून, निवडणूक आयोगाकडून भाजपला उघडपणे फायदा पोहोचवला जात आहे. त्यामुळे लोकशाही मानणाऱ्या सर्वांनीच आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.” ‘हा लढा राहुल गांधींनीच सुरू केला’ यावेळी बोलताना पटोले यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भूमिकेची आठवण करून दिली. ” ज्याचा थेट फायदा भाजपला होत आहे. याविरोधात राहुल गांधी सुरुवातीपासूनच लढा देत आहेत. ही मूळ लढाई काँग्रेसचीच असून ती आम्ही प्राणपणाने लढत आहोत,” असे पटोले म्हणाले. ‘फक्त पक्षापुरते नाही, जनआंदोलन व्हावे’ ४ ऑक्टोबरचा हा मोर्चा केवळ ठाकरे बंधूंचा किंवा राजकीय पक्षांपुरता मर्यादित राहू नये, तर ते एक व्यापक ‘जनआंदोलन’ व्हावे, अशी अपेक्षा काँग्रेसने व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आता ठाकरे बंधूंच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसही मैदानात उतरणार असल्याने, राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे. ————– ही बातमी पण वाचा.. निवडणूक आयोगावर बोलतोय तर भाजपला त्रास का?:’शिवतीर्था’वरून राज ठाकरे – उद्धव ठाकरेंची संयुक्त गर्जना; 4 ऑक्टोबरला विराट मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वादग्रस्त ‘विशेष सघन पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दशकांनंतर अत्यंत ऐतिहासिक राजकीय चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी संयुक्त पत्रकार परिषद घेत 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत निघणाऱ्या महामोर्चाची अधिकृत घोषणा केली. “हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा किंवा सत्तेच्या स्पर्धेचा नसून, देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीचा लढा आहे. त्यामुळे या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील, सर्वांच्या हातात फक्त राष्ट्रध्वज तिरंगाच फडकेल,” अशी साद दोन्ही ठाकरे बंधूंनी तमाम जनतेला आणि सर्वपक्षीय नेत्यांना घातली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *