Headlines

ठाणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ:प्रवाशांना आधीच कळणार भाडे, रिक्षाचालक-प्रवाशांमधील वादांना आळा




रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालक आणि प्रवाशांमधील वाद, भाड्यावरून होणारे मतभेद आणि रिक्षांच्या रांगांमुळे निर्माण होणारी गर्दी कमी करण्यासाठी ठाण्यात प्रीपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ करण्यात आला. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सुरू झालेला हा ठाण्यातील पहिला प्रीपेड रिक्षा उपक्रम असल्याचे सांगण्यात आले. स्व. वसंतराव डावखरे रिक्षा-टॅक्सी चालक-मालक महासंघ आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रीपेड रिक्षा स्टँड आणि कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पाठपुरावा केला होता. प्रवासाआधीच भाडे निश्चित प्रीपेड रिक्षा व्यवस्थेमुळे प्रवाशांना रिक्षात बसण्यापूर्वीच त्यांच्या गंतव्यस्थानाचे निश्चित भाडे समजणार आहे. त्यामुळे प्रवास पूर्ण झाल्यानंतर भाड्यावरून होणारे वाद किंवा गैरसमज कमी होण्याची शक्यता आहे. स्थानकातून बाहेर पडल्यानंतर रिक्षा शोधणे आणि भाड्याची घासाघीस करण्याचा त्रासही प्रवाशांना कमी होणार आहे. या व्यवस्थेमुळे रिक्षाचालकांनाही नियोजित पद्धतीने प्रवासी मिळण्यास मदत होणार असून, स्थानक परिसरातील रिक्षांच्या रांगा आणि चालकांमधील संभाव्य वाद कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रिक्षाचालकांच्या कमाईचीही व्यवस्था प्रीपेड सेवेच्या अंमलबजावणीदरम्यान रिक्षाचालकांच्या दैनंदिन कमाईचा मुद्दाही विचारात घेण्यात आला. दिवसभराच्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न त्याच दिवशी कुटुंबाच्या गरजांसाठी वापरणाऱ्या चालकांना अडचण येऊ नये, यासाठी व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दिवसभराच्या व्यवसायाचा हिशेब पूर्ण झाल्यानंतर संबंधित रिक्षाचालकाची रक्कम थेट त्याच्या बँक खात्यात जमा होईल. त्यामुळे रोख व्यवहार कमी होऊन चालकांच्या उत्पन्नाचा व्यवहार अधिक व्यवस्थित आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. दीड-दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर सेवा सुरू ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांच्या रांगा, चालकांमधील वाद आणि प्रवाशांशी होणारे मतभेद यावर तोडगा काढण्यासाठी प्रीपेड रिक्षा सेवेची संकल्पना पुढे आली होती. मात्र, प्रशासकीय तसेच तांत्रिक अडचणींमुळे तिच्या अंमलबजावणीला वेळ लागला. विविध पातळ्यांवर पाठपुरावा केल्यानंतर अखेर ही सेवा सुरू करण्यात आली. या उपक्रमाला मान्यता देऊन सेवा सुरू करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आमदार निरंजन डावखरे यांनी आभार मानले. तसेच व्यवस्थेच्या अंमलबजावणीत सहकार्य केल्याबद्दल सिटीफ्लोचेही त्यांनी आभार व्यक्त केले. प्रीपेड रिक्षा सेवेच्या शुभारंभावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, रिक्षा युनियनचे अध्यक्ष मारुती सावंत, युनियनचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे स्थानकाबाहेरील रिक्षा सेवा अधिक शिस्तबद्ध करण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या या प्रीपेड व्यवस्थेचा प्रत्यक्षात प्रवाशांना किती फायदा होतो, हे तिच्या अंमलबजावणीवर अवलंबून राहणार आहे. हेही वाचा… डीजेच्या दणदणाटाची मुंबई हायकोर्टाकडून सुमोटो दखल:नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश, उद्या तातडीची सुनावणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या ध्वनीप्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्वतःहून दखल घेतली. उत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात वाजणाऱ्या डीजेसह ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. याप्रकरणी जनहित याचिका दाखल करत राज्य सरकारकडून ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर झालेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. सविस्तर वाचा …



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *