Headlines

ठाण्यातील रहेजा कारलाइन इमारतीला भीषण आग:8 व्या मजल्यावरून 14 व्या मजल्यापर्यंत आगीचा फैलाव, नागरिक अडकल्याची भीती




ठाण्यातील रहेजा कारलाइन इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. इमारतीच्या 8 व्या मजल्यावर अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करत 14 व्या मजल्यापर्यंत मजल मारली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, इमारतीच्या वरच्या मजल्यांवर काही कुटुंबे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. रहेजा कारलाइन इमारतीच्या 8 व्या मजल्यावर अचानक आग लागल्याने सुरुवातीला परिसरात धावपळ उडाली. आगीची तीव्रता वाढत गेल्याने काही वेळातच ती 14 व्या मजल्यापर्यंत पसरली. इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वरच्या मजल्यांवर रहिवासी अडकले असण्याची शक्यता असल्याने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे मोठे आव्हान बचाव पथकासमोर आहे. आगीचे वृत्त समजताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवी फाटक, पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम तसेच ठाणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, बचावकार्याचा आढावा घेत आहेत. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीतील अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत किती नागरिक अडकले आहेत किंवा कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासोबतच इमारतीतील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. आगीची तीव्रता आणि बचावकार्य लक्षात घेता प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *