![]()
प्रतिनिधी | अकोला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी नशाबंदी मंडळातर्फे तंबाखू विरोधी जनजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे. “तंबाखूला नकार द्या आणि आरोग्याला होकार द्या’ हे, अभियान राबवण्यात येत असल्याचे महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक बबनराव कानकिरड यांनी कळवले आहे. हे अभियान ६ जूनपर्यंत राबवण्यात येत आहे. तंबाखू हा मानवा समोरील सर्वात मोठा धोका आहे. तंबाखू सेवनाने आयुष्य उध्वस्त होते. वेळ, श्रम, बुद्धी, पैशाची नासाडी होते. सर्वांनी त्याच्या दुष्परिणामाबाबत जागृत होण्याची आणि तंबाखूला कायम बहिष्कृत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक बबनराव कानकिरड यांनी या प्रसंगी केले. तंबाखू विरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे वतीने शहरात ठिकाणी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्ञानज्योत अकॅडमीचे संचालक प्रा. निखिल पातोंड उपस्थित होते. सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम भारत सरकार, जिल्हा शल्य चिकित्सक, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अकोला, जिल्हा सर्वोदय मंडळ, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्यासह विविध संस्था संघटनांच्या समन्वयाने महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे वतीने तंबाखू विरोधी दिनानिमित “तंबाखूला नकार आणि आरोग्याला स्वीकार’ या सप्ताहांतर्गत जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार, श्रीकृष्ण विखे पाटील, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष गोवर्धन खवले,डॉ. काशीनाथ दाते, डॉ. आकाश इंगळे, संगीता नवले, साने गुरुजी वाचनालयाच्या ज्योती सरदार, अजय चव्हाण, आनंद खंडारे, गौरव काळे, मनोज भवते, अनिकेत बावस्कर, राघव नवले, चंदू नेमाडे यांचेसह श्री गुरुदेव सेवा मंडळ, सर्वोदय मंडळ, नशाबंदी मंडळ, विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. येथे केली जनजागृती : सप्ताहाअंतर्गत जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रात बस स्थानक,महसूल कॉलनी, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्था रणपिसेनगर, साने गुरुजी वाचनालय जठार पेठ येथे आयोजित कार्यक्रमात शालेय- महाविद्यालय, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणामाबाबत माहिती देण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा ३१ मे रोजी ३०१ वा जयंती उत्सव होता. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने ३१ मे हा दिवस तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी तंबाखू सेवन न करण्याचा संकल्प करून पुण्यश्लोक अहिल्या देवींना अभिवादन करण्याचे आवाहन ज्ञानज्योत अकॅडमीचे संचालक प्रा. निखिल पातोंड यांनी केले.
Source link
तंबाखूला नकार द्या अन् सुदृढ आरोग्याला होकार द्या:जनजागृती अभियानात जिल्हा संघटक बबनराव कानकिरड यांचे आवाहन