![]()
ताहाराबाद वनपरीक्षेत्र हद्दीतील मोहळांगी, जाड व पिंपळकोठे येथे आठवडाभरात तीन आगीच्या घटना घडल्या. यात मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे नुकसान झाले आहे. अनेक वन्यप्राण्याचा होळपळून मृत्यू झाल्याचे समजते. ताहाराबाद वन परीक्षेत्र हद्दीतील दि. ५ रोजी मोहळांगी येथील जंगलास आग लागली वन कर्मचाऱ्यांनी स्थानिका़च्या मदतीने चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळविले. चार तासांत आग विझविण्यात यश आले. ४ हेक्टर वनसंपदेचे नुकसान झाल्याचे वनक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शरमाळे यांनी सांगितले. दि. १० रोजी जाड येथील वनक्षेत्रास आग लागली. यात दोन हेक्टरचे नुकसान झाले असून, दोन तासांत वन कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. दि. ११ रोजी पिंपळकोठे येथील डोंगरास रात्री आग लागली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन तासांत आग विझवली. या घटनेत दोन हेक्टर वनसंपदेचे नुकसान झाल्याचे ताहाराबाद वन अधिकाऱ्यांनी सांगितले. ताहाराबाद वनक्षेत्रात आगीच्या घटनेत वाढ होत आहे. वन परीक्षेत्र अधिकारी अनेकदा मुख्यालयी नसतात. त्यांचा संपर्कही होत नसल्याचे आढळून येते. परिणामी, वन कर्मचाऱ्यांवर अंकुश राहत नाही, त्यामुळे आगीच्या घटनांत वाढ होत असल्याचा आरोप नगारिकांनी केला आहे.
Source link
ताहाराबाद वनक्षेत्रात एका आठवड्यात 3 आगीच्या घटना:मोहळांगी, पिंपळकोठे आणि जाड वनक्षेत्रास आग