![]()
मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे अधिक मास अखंड हरिनाम सप्ताह निमित्त तुका केवडा केवडा तुका आकाशा एवढा अर्थात तुका जातो वैकुंठाला या नाट्यप्रयोगाचे यशस्वीरित्या सादरीकरण करण्यात आले. नरखेड ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी नाट्य मंडळ सोहाळे यांचा तुका जातो व
.
संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव निमित्त तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित अनेक प्रसंग या नाटकातून कलाकारांनी यशस्वीरित्या सादर केले सर्व प्रसंग पाहून प्रेक्षक भारावून गेले. श्री संत तुकाराम महाराज वैकुंठाला जात असताना सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. या प्रसंगाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. छत्रपती शिवाजी महाराज व तुकाराम महाराज यांची भेट पाहताना सर्व प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले.
या ऐतिहासिक आणि भक्तीमय नाट्यप्रयोगाप्रसंगी सरपंच बाळासाहेब मोटे, माजी सरपंच विनोद पाटील, सुधाकर पाटील, समाधान मोटे, बाळासाहेब मोटे तसेच कार्यक्रमाचे संयोजक धर्मराज गोठणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निरंकार क्लासेसचे संचालक दिनेश नरळे नरखेड यांनी केले.
या कलाकारांची भूमिका रंगमंचावर पार पडलेल्या या नाटकात छत्रपती शिवाजी नाट्य मंडळाच्या खालील कलाकारांनी मुख्य भूमिका चोख बजावल्या. संत तुकाराम महाराज: नाटकाचे लेखक प्राध्यापक बाळासाहेब चटे, मुंबाजीबुवा: सुरेश बचुटे, रामेश्वर शास्त्री: माऊली घुले, पांडुरंग: डॉ. मारुती जगताप, छत्रपती शिवाजी महाराज: गणेश चव्हाण.