Headlines

तुतारीतून निघाले कमळ!: अंबादास दानवेंची कडाडून टीका, पवारांच्या पक्षाने भाजपला साथ दिल्यास उद्या जनताच नाकारेल! – Ambadas Danve Slams Sharad Pawar NCP; Warns Against BJP Alliance


संसदेच्या विशेष अधिवेशनात येऊ घातलेल्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे य

.

सोशल मीडियावर ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हातील तुतारीतून ‘कमळ’ बाहेर पडताना दाखवणारी पोस्ट शेअर करून त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलेच डिवचले आहे. “मी कोणतेही चिन्ह बदललेले नाही, तर सद्यपरिस्थितीत जे काही चित्र बाहेर दिसत आहे, त्यावर एक व्यंगचित्र या नात्याने भाष्य केले आहे,” असे स्पष्ट करत दानवे यांनी शरद पवार गटाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, 10 आमदार असलेल्या पक्षाला भाजप मुख्यमंत्रीपद देईल या केवळ हवेतील गप्पा असून, शरद पवार गटाने भाजपला पाठिंबा दिल्यास महाविकास आघाडीतील सहवास आणि जनतेचा विश्वास दोन्ही गमावून बसतील, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपला साथ देणे हा पाठीत खंजीरच!

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार गटावर केलेल्या ‘पाठीत खंजीर खुपसण्याच्या’ टीकेचे अंबादास दानवे यांनी समर्थन केले. “राज्यसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे (उबाठा) सर्वाधिक 20 खासदार, काँग्रेसचे 16 खासदार आणि शरद पवार गटाचे केवळ 10 खासदार होते. संख्याबळ कमी असूनही शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि देशाच्या संसदेत त्यांची भूमिका महत्त्वाची असते या उदात्त हेतूने केवळ काँग्रेसनेच नव्हे, तर शिवसेनेनेही मोठे मन दाखवून त्यांना राज्यसभेची जागा सोडली होती. असे असताना आज ते भाजपला पाठिंबा देत असतील, तर विजय वडेट्टीवार जे बोलले ते असत्य नाही.”

रोहित पवार या भूमिकेशी एकरूप होणार नाहीत

काल जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंब्याची भूमिका जाहीर केली, तर खासदार अमोल कोल्हे यांनी अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले; मात्र राष्ट्रवादीचे नेते ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या बैठकीला गेले नाहीत हे सत्य आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार हे गेल्या 2 ते 3 वर्षांपासून एमपीएससी (MPSC) आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढत आहेत. त्यांनी नुकतेच रामायणातील त्याग आणि महाभारतातील स्वार्थाचे दाखले दिले आहेत; त्यामुळे शरद पवार गटाने अशी भूमिका घेतल्यास रोहित पवार त्या भूमिकेशी कधीही एकरूप होणार नाहीत.

भाजप 10 आमदारांच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद देईल या हवेतील गप्पा!

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बदल्यात खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांवर अंबादास दानवे यांनी जोरदार खिल्ली उडवली. ज्या भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे 133 ते 135 आमदार आहेत आणि जे कोणाच्याही मदतीशिवाय 145 चा आकडा गाठू शकतात, तो पक्ष केवळ 10 आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री कसा करेल? सत्तेत आधीच 60 आमदारांसह एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांसह अजित पवार यांचा पक्ष बसलेला आहे. त्यामुळे 10 आमदारांच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळणार हे केवळ हवेतील बुडबुडे आहेत, असे कदापि होणार नाही.

पक्ष फुटण्याच्या भीतीने भूमिका बदलणारे आम्ही नाही

पक्ष फुटू नये म्हणून डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला जात असल्याच्या चर्चांवर अंबादास दानवे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मूलभूत फरक स्पष्ट केला. पक्ष फुटेल या भीतीने भूमिका बदलणे हा शिवसेनेचा स्वभाव नाही. जे व्हायचे ते होईल, पण आपल्या भूमिकेत व विचारांत कोणताही बदल करायचा नाही, असा रोकठोक बाणा शिवसेनेने कायम जपला आहे. बोलायचे एक, दाखवायचे एक आणि प्रत्यक्षात करायचे वेगळे, हे शिवसेनेने कधीही केले नाही आणि करणारही नाही.

6 महिन्यांपूर्वी ज्यांनी विरोध केला, तेच आज पाठिंबा कसा देणार?

डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपकडून ईडी (ED) आणि सीबीआयचा (CBI) दबाव टाकला जात असला तरी त्यांचे आकडे अद्याप जुळत नाहीत. ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी या विधेयकाला विरोध केला होता, ते आज अचानक पाठिंबा कसा देतील? उलट गेल्या 6 महिन्यांत देशात भाजपविरोधी वातावरण अधिक तीव्र झाले आहे.

मतभेद आल्यास आघाडीला अर्थ उरणार नाही

महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जर अशा महत्त्वाच्या वैचारिक मुद्द्यावर मतभेद निर्माण झाले, तर आघाडीला काहीही अर्थ उरणार नाही. शिवसैनिक हा अत्यंत संवेदनशील असून तो इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा भावनेला आणि निष्ठेला महत्त्व देतो; त्यामुळे या भावनेला ठेच पोहोचल्यास मोठी अडचण निर्माण होईल, असा सूचक इशाराही अंबादास दानवे यांनी दिला.

—————————————————

हेही वाचा…

राज ठाकरेंनी 2023 मध्येच केली होती भविष्यवाणी:”पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने गेली, यथावकाश दुसरी टीमही सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!”

केंद्र सरकारने आणलेल्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) आणि महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) एनडीएला (NDA) पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांमुळे शनिवारी (28 नोव्हेंबर) राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी शरद पवार गटाच्या या संभाव्य भूमिकेवर ‘पाठीत खंजीर खुपसला’ अशा शब्दांत टीका सुरू केलेली असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2 जुलै 2023 रोजी केलेले एक जुने ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.