![]()
सातपुड्याच्या पायथ्याशी आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट परिसरात संत्रा, मोसंबी व लिंबूची कलमे विक्रीसाठी तयार झाली आहेत. आता लागवडीसाठी अनुकूल आणि दमदार पावसाची प्रतीक्षा उत्पादक शेतकरी करत आहेत. पाऊस चांगला झाल्यानंतर राज्यासह राजस्थान, मध्यप्रदेश आणि इतर राज्यांतील शेतकरी येथे मोठ्या प्रमाणात कलम खरेदीसाठी येतात. शेंदूरजनाघाट परिसर संत्रा कलम उत्पादनासाठी देशभरात ओळखला जातो. तिवसाघाट, सातनूर, वाई, रवाळा, धनोडी, पुसली आणि मालखेड या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर संत्रा, मोसंबी व लिंबूची कलमे तयार केली जातात. या व्यवसायावर परिसरातील अनेक शेतकरी आणि शेतमजुरांची उपजीविका अवलंबून आहे. संत्र्यामध्ये नागपुरी, रंगपूर आणि एलिमो या जातींची, तर मोसंबीमध्ये न्यूसेलर आणि गावराणी जातींची कलमे तयार केली जातात. मागील दोन-तीन वर्षांपासून संत्र्याला अपेक्षित दर मिळाला नसल्याने उत्पादक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे यंदा कलमांना समाधानकारक भाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. वरुड तालुक्यात शासनमान्य ३६५ नर्सरी आहेत. या नर्सरींमधून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग योजना तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांसारख्या योजनांतील लाभार्थी शेतकरी कलमे खरेदी करतात. यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत कलमांची लागवड काहीशी कमी झाली आहे. मात्र उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने यंदा कलमांना चांगला बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा उत्पादकांनी व्यक्त केली आहे. संत्रा-मोसंबी कलम तयार करण्याची प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबरमध् ये ईडीलिंबूच्या बियांची आळे किंवा बेड पद्धतीने पेरणी केली जाते. त्यापासून तयार झालेली जंभेरी रोपे जुलै-ऑगस्टमध्ये शेतात निश्चित अंतरावर लावली जातात. रोपांची योग्य वाढ झाल्यानंतर काटे काढणे, पाने कमी करणे आणि काड्या घासणे अशी पूर्वतयारी केली जाते. नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान तीन ते चार वर्षे वयाच्या संत्रा, मोसंबी किंवा लिंबाच्या झाडांवरील निवडक डोळा (बड) जंभेरीवर चढवला जातो. सुमारे २१ दिवसांनी बांधलेली प्लास्टिक पट्टी काढली जाते. डोळा यशस्वीरीत्या जिवंत राहिल्यास त्याच्या वरचा भाग छाटून नवीन अंकुर वाढवला. यंदा समाधानकारक दराची अपेक्षा ^मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कलमांची लागवड कमी आहे. दुसरीकडे खते, कीटकनाशके, मजुरी आणि इतर खर्च वाढले आहेत. त्यामुळे यंदा कलमांना चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आहे. – विलास झाडे, कलम उत्पादक, शेंदूरजनाघाट.
Source link
दमदार पावसाच्या प्रतीक्षेत संत्रा, मोसंबी उत्पादक:कलमा तयार, 365 शासनमान्य नर्सरी, समाधानकारक दर मिळण्याची अपेक्षा