Headlines

दारूबंदीविरोधात महिलांचा एल्गार; गावातील विक्रेत्यांच्या घरांवर धडक:युवापिढी व्यसनाधीन होत असल्याचे गंभीर चित्र समोर‎




तालुक्यातील हिवरा कोरडे परिसरासह संपूर्ण तालुक्यात सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीमुळे महिला आणि पालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गावात दारूबंदीविरोधात महिलांनी एल्गार पुकारात विक्रेत्यांच्या घरांवर धडक दिली. संपूर्ण तालुका दारु आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडले असून युवापिढी व्यसनाधीन होत असल्याचे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे.हिवरा कोरडे गावातील महिलांच्या संतापाचा अखेर उद्रेक होऊन दारू विक्रीला आळा घालण्याच्या मागणीसाठी महिलांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली. दारू विक्री होणाऱ्या ठिकाणी धडक देत महिलांनी दारूच्या बाटल्या फोडून आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनामुळे गावातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. हिवरा कोरडे परिसरात देशी दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. गावात दारू विक्री बंद करण्यासाठी यापूर्वीही अनेकदा तक्रारी व मागण्या करण्यात आल्या. मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याने महिलांचा संयम सुटला.अखेर महिलांनी एकजूटता दाखवत दारू विक्रीविरोधात थेट रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला. पोलिसांची धाव महिलांचा आक्रमक पवित्रा पाहता परिस्थिती चिघळू नये, यासाठी माना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आंदोलक महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, केवळ समज देऊन प्रश्न सुटणार नसून दारू विक्रेत्यांवर ठोस कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका महिलांनी घेतली. संपूर्ण तालुका दारू आणि अंमली पदार्थ यांच्या विळख्यात अडकला असून याबाबत कठोर पाऊले उचलण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. दारूच्या गुत्त्यावर महिलांचा संतापाचा उद्रेक गावातील दारूची विक्री होत असल्याचे ठिकाणी महिलांनी धडक दिली. दारू विक्रीच्या ठिकाणी असलेल्या देशी दारूच्या बाटल्या फोडण्यात आल्या. दारू विक्री करणाऱ्यांच्या घरांवर महिलांनी थेट धडक देत दारूचा साठा उध्वस्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. महिलांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे दारू विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दारूमुळे गावातील कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक परिणाम होत असल्याचा आरोप महिलांनी केला. दारू विक्रीमुळे तरुण पिढीही व्यसनाच्या विळख्यात जात असल्याने गावात कायमस्वरूपी दारूबंदी लागू करण्याची मागणी महिलांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *