![]()
अमेरिकन कोर्टाने अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावरील सर्व फौजदारी आरोप कायमचे फेटाळून लावले आहेत. त्यांचे पुतणे सागर अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे माजी सीईओ यांच्यावरील फसवणुकीशी संबंधित ३ आरोपही फेटाळण्यात आले आहेत. हा निकाल न्यूयॉर्कचे न्यायाधीश निकोलस गैरॉफिस यांनी सुनावला. आता हे आरोप पुन्हा लावता येणार नाहीत. मात्र, कोर्टाने म्हटले आहे की, याचा अर्थ आरोप खरे की खोटे यावर निकाल दिलेला नाही. ना खटला चालला, ना साक्ष झाली आणि ना पुराव्यांची तपासणी झाली. न्याय विभागाची आरोप मागे घेण्याची प्रक्रिया न्यायाधीशांनी ‘अत्यंत असामान्य’ असल्याचेही म्हटले आहे. ते म्हणाले की, या निकालाला न्याय विभागाच्या निर्णयाशी सहमती मानू नये. सुनावणीदरम्यान नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकेत सुमारे ९५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १५ हजार नोकऱ्या निर्माण करण्याच्या अदानी यांच्या घोषणेचीही चौकशी झाली. मात्र, आरोप मागे घेण्याच्या निर्णयावर या घोषणेचा कोणताही परिणाम झाला नाही, असे न्यायाधीशांनी मान्य केले. इतर ५ सहआरोपींवरील आरोपांवर कोर्टाने कोणताही निकाल दिलेला नाही. न्याय विभागाला यावर सोमवार, ३१ ऑगस्टपर्यंत माहिती द्यायची आहे. आरोप काय होते नोव्हेंबर २०२४ च्या आरोपपत्रात अदानी ग्रुपवर सोलार पॉवर कॉन्ट्रॅक्टसाठी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे २,५०० कोटी रुपयांची लाच देणे आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या दिशाभुलीचा आरोप होता. भारतीय राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटले होते. अदानींवर कारवाई करावी, अशी मागणीही काही गटांकडून होत होती. निकालावर अदानी म्हणाले… सत्याचा विजय सत्याचा विजय झाला. अमेरिकन कोर्टाचा निकाल मी नम्रता आणि सन्मानाने स्वीकारतो. या आव्हानात्मक काळात सत्य, निष्पक्षता आणि कायद्याच्या राज्यावरील आमचा विश्वास कधीही ढळला नाही. आम्ही राष्ट्र उभारणी, दीर्घकालीन मूल्यनिर्मिती आणि स्वतःपेक्षा मोठ्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी काम करत राहू. – गौतम अदानी, निकालानंतर
Source link
दिलासा:अमेरिकन कोर्टाने अदानींवरीलसर्व फौजदारी आरोप रद्द केले, 2 वर्षे जुन्या प्रकरणात फेडरल कोर्टाचा निकाल