Headlines

दिवाळी सांज पाडवा:कोटंबीत सोंगे मुखवटे आणि संबळ कलापथकांचे बहारदार सादरीकरण, आदिवासी संस्कृतीचे जतन व सन्मान साेहळा




पेठ तालुक्यातील कोटंबी येथे दिवाळी सांज पाडवा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आदिवासी संस्कृतीचे जतन, शिक्षणास प्रोत्साहन आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मानाच्या त्रिवेणी संगमाने हा सोहळा रंगला. यावेळी प्रा. डॉ. मधुचंद्र भुसारे यांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मेमोरियल एक्सलन्स अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल पेठचे पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोकणा जमातीच्या बोलीभाषेवरील संशोधनाबद्दल डॉ. भुसारे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. ​सिंह ढोल नृत्य, ठाकर नाच-गाणे, सोंगे मुखवटे आणि संबळ कलापथकांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. पोलिस पाटील नामदेव भुसारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात डॉ. नितीन गायकवाड यांसह मान्यवर उपस्थित होते. किरण भुसारे यांनी सूत्रसंचालन केले, तर अनिल भुसारे व कमलाकर चौधरी यांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *