![]()
नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. हिमालयातील अतिउंच पर्वतरांगा ओलांडून येणाऱ्या देखण्या ‘पट्टेदार हंस’ अर्थात बार-हेडेड गूझचे आगमन पक्षीप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरले आहे. पट्टेदार हंस हा वैशिष्ट्यपूर्ण रूपामुळे सहज ओळखला जातो. पांढऱ्याशुभ्र मस्तक व मानेवर असलेले काळ्या रंगाचे दोन ठळक वलयाकार पट्टे, सोनेरी-पिवळसर चेहरा आणि पिवळी चोच यामुळे त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. हा पक्षी आकाशात थव्याने उंच भरारी घेताना निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेतो. या पक्ष्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची अफाट उंचीवरून उड्डाण करण्याची क्षमता. हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतरांगा ओलांडून स्थलांतर करणाऱ्या या पक्ष्याला विरळ ऑक्सिजन आणि अतिशय कमी तापमानाचा सामना करावा लागतो. हजारो किलोमीटरचा प्रवास करण्याची त्याची क्षमता पक्षीविश्वातील एक अद्भुत निसर्गचमत्कार मानली जाते.
Source link
हिमालयातील ‘पट्टेदार हंस’ नांदूरमध्यमेश्वरमध्ये दाखल:बार-हेडेड गूझचे आगमन पक्षीप्रेमींसाठीठरणार आकर्षण