Headlines

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई:वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तांत्रिक यंत्रणा ‘हायअलर्ट’वर




राज्यात दुष्काळाची छाया पसरल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने आपल्या संपूर्ण तांत्रिक यंत्रणेला ‘हायअलर्ट’वर ठेवले आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतीसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी राज्यभरातील अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांना आपापले मुख्यालय न सोडण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी याबाबत नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. यंदाच्या जून महिन्यापासून राज्यात पर्जन्यमानात मोठी तूट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम शेती पिकांवरही होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विविध दुष्काळी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी महावितरणनेही राज्यभरातील तांत्रिक यंत्रणा अधिक सतर्क केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विविध परिमंडलांचा आढावा मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या आदेशानुसार महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध परिमंडलांमध्ये तातडीने दौरे केले. संचालक धनंजय औंढेकर (संचालन), योगेश गडकरी (वाणिज्य), सचिन तालेवार (प्रकल्प), राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांच्यासह सर्व कार्यकारी संचालकांनी या दौऱ्यांदरम्यान दुष्काळी परिस्थितीत कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या तांत्रिक कामांचा आढावा घेतला. यावेळी वीजयंत्रणेची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. दुष्काळाच्या काळात वीजपुरवठ्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी तांत्रिक यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधील अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांना आपापल्या मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतीसह इतर सर्व ग्राहकांसाठी वीजपुरवठा सुरळीत राहणे महत्त्वाचे असल्याने त्याबाबत विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीजपुरवठा कोणत्याही कारणामुळे खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा किंवा तातडीने दुरुस्तीची कामे करून वीजपुरवठा पूर्ववत करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. कामात हयगय केल्यास शिस्तभंगाची कारवाई दुष्काळाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या कामात कोणतीही हयगय होऊ नये, यासाठी महावितरणने कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. दिलेल्या जबाबदारीत हयगय करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर होत असताना कृषिपंपांसह सर्व ग्राहकांना आवश्यक वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणची तांत्रिक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. हेही वाचा… रोहित पवारांची केंद्र-राज्य सरकारवर टीका:मतदारयादीतील घोळावरून निवडणूक आयोगावर निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली. देशातील वाढती महागाई, तेलाचे दर, परराष्ट्र धोरण, मतदारयादीतील कथित घोळ तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले. कर्मवीर जयंतीनिमित्त कोपरगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *