Headlines

जवाहर नवोदय विद्यालय कन्नड:इयत्ता 9 वी व 11 वी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ




पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता 9 वी आणि इयत्ता 11 वी (विज्ञान शाखा) प्रवेश परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत 1 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर 2026 अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेता यावा यासाठी ही मुदत आता 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य पी. ओ. देशमुख यांनी केले आहे. अर्ज भरण्यासाठी अधिकृत लिंक्स: इयत्ता 9 वी प्रवेशासाठी: https://cbseitms.nic.in/2026/nvsix इयत्ता 11 वी (विज्ञान शाखा) प्रवेशासाठी: https://cbseitms.nic.in/2025/nvsxi ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी व पालकांनी संकेतस्थळावर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अचूक माहिती भरावी, असे आवाहन विद्यालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *