Headlines

दूध भेसळ प्रकरणी 10 नवे आरोपी अटक:आरोपींची संख्या 36 वर पोहोचली; 11 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी




पुणे जिल्ह्यात उघडकीस आलेल्या दूध भेसळ प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी १० आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची एकूण संख्या ३६ वर पोहोचली आहे. या मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक भेसळयुक्त दूध तयार करणे, त्याचा पुरवठा व वितरण तसेच या संपूर्ण व्यवहाराशी संबंधित आर्थिक बाबींचा सखोल तपास करत आहे. मंचर पोलिसांनी अटक केलेल्या १० आरोपींमध्ये संतोष बाबन मोरे (४३), दत्तात्रय रामदास भगवत (४१), गणेश सुदाम पडवळ (४०), आनंदा मारुती पवार (५६), कुलदीप प्रकाश पवळे (३०), रविराज बाबन थोरात (३३), राजेंद्र भगवान शिंदे (४५), ओंकार पोपट गिरवले (२८), आशीष विष्णू लोंढे (३०) आणि सतीश महादू नवले (४७) यांचा समावेश आहे. यापूर्वी या प्रकरणात २६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यापैकी १४ जणांना अटक करण्यात आली होती. आता आणखी १० आरोपींवर कारवाई झाल्याने प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या ३६ झाली आहे. या दूध भेसळ रॅकेटचा तपास करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि मंचर पोलिसांच्या संयुक्त विशेष तपास पथकाकडून भेसळीची पद्धत, आर्थिक व्यवहार, दूध पुरवठा साखळी आणि या गुन्ह्याशी संबंधित अन्य बाबींची सखोल चौकशी सुरू आहे. फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *