![]()
बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपले सर्वच क्षेत्रांतील वजन कमी झाले होते, अशी कबुली देत अप्रत्यक्षपणे पश्चात्ताप व्यक्त केला. त्यांच्या याच विधानाचा धागा पकडत आज मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “तुला उशिरा का होईना शहाणपण आलं, ते तरी बरं झालं,” असा खोचक टोला जरांगे यांनी लगावला आहे. जातीपातीचे राजकारण धनंजय मुंडे यांनीच सुरू केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे समर्थन, मराठा आंदोलनाविरोधातील भूमिका आणि गुन्हेगारांची साथ यावरून त्यांनी मुंडेंना लक्ष्य केले. मराठ्यांशी गद्दारी केल्याचा आरोप मनोज जरांगे म्हणाले की, परळीतील ज्या मराठा समाजाने धनंजय मुंडेंना मोठं केलं, त्याच समाजाशी त्यांनी गद्दारी केली. मराठा समाजाविरोधात भूमिका घेऊन जातीवादाचे राजकारण धनंजय मुंडे यांनीच सुरू केले, असा आरोप त्यांनी केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे समर्थन करणे, तसेच इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची बाजू घेणे, हा देखील जातीवादाचाच प्रकार असल्याचे जरांगे म्हणाले. ‘माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या देणेही जातीवादच’ जरांगे यांनी आरोप केला की, त्यांच्या घातपातासाठी सुपाऱ्या देण्याचा प्रयत्न झाला. तसेच एका बलात्कार प्रकरणातील आरोपीलाही धनंजय मुंडे यांनी समर्थन दिल्याचा दावा त्यांनी केला. गुन्हेगारांची पाठराखण करणाऱ्यांनी समाजाला न्याय देण्याची भाषा करू नये, असा टोला त्यांनी लगावला. ‘उशीरा का होईना, शहाणपण आलं हे चांगलं’ धनंजय मुंडे आता पश्चाताप करत असल्याचे दिसत असल्याचा उल्लेख करत जरांगे म्हणाले, “उशीरा का होईना, तुम्हाला शहाणपण आलं हे चांगलं आहे. सुधारायचं असेल तर आम्हाला त्यात अडचण नाही. मात्र मराठा समाजाच्या नादी लागू नका आणि गुन्हेगारी करणाऱ्यांची साथ देऊ नका.” धनंजय मुंडे यांच्या भूमिकेचा फटका त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनाही बसत असल्याचेही जरांगे यांनी यावेळी म्हटले. हेही वाचा.. सर्व क्षेत्रांतील आपलं वजन कमी झालं होतं,पण येणारा काळ आपलाच:धनंजय मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा, म्हणाले- महापुरुषांना जातीत बांधू नका मी स्वत: व्यायाम करत माझे वजन कमी केले असेही आपले सर्वच क्षेत्रातील वजन कमी झाले होते, पण येणारा काळ आपला आहे, त्यामध्ये आपण अतिशय फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जीम करतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. मागच्या दीड वर्षांमध्ये माझ्या जीवलग सहकाऱ्यांनी सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न केला भाऊ तब्बेत कशी आहे? हे ऐकूण मी परेशान झालो आणि ठरवले की आता चमत्कार दाखवावा लागेल. सिरसाळा येथील बंजारा समाजाच्या कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी माजी मंत्री मनोहर नाईक आणि आमदार इंद्रनील नाईक यांच्या कुटुंबाचे कौतुक केले. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्यानंतर आता इंद्रनील नाईक यांनाही मंत्रीपद मिळाले, हे अत्यंत नशीबवान घराणे आहे. मात्र, आम्ही दोघे मंत्री झालो तर जमले नाही, एकाला घरी बसावे लागले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सविस्तर वाचा
Source link
धनंजय मुंडेंच्या विधानावर मनोज जरांगेंची टीका:म्हणाले- उशीरा शहाणपण आलं, आता मराठ्यांच्या नादी लागू नका अन् गुन्हेगारांची साथ सोडा