Headlines

धार्मिक उत्सवांचे पावित्र्य जपत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण गरजेचे:रोहित टिळक यांचे मत, सामाजिक एकोपा आणि शांतता महत्त्वाची




धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव समाजाला एकत्र आणणारे महत्त्वाचे माध्यम आहेत. यातून सामाजिक एकोपा आणि परस्परांना मदत करण्याची भावना वाढते. त्यामुळे हे उत्सव उत्साहात साजरे व्हावेत, पण त्यांचे पावित्र्य आणि नागरिकांची शांतता जपली जावी, असे मत लोकमान्य टिळक यांचे खापर पणतू रोहित टिळक यांनी व्यक्त केले. धार्मिक उत्सवांमुळे माणसाला मानसिक आधार आणि एक प्रकारचे सामाजिक कवच मिळते. श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असली तरी, एखाद्या ‘सुपरपॉवर’समोर नतमस्तक होण्याची भावना चांगले आचरण करण्याची प्रेरणा देते. मात्र, उत्सवांचे स्वरूप मोठे होत असताना अनावश्यक भपकेबाजी, मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिम आणि वाहतुकीसह नागरिकांना त्रासदायक गोष्टी वाढू नयेत. न्यायालय आणि प्रशासनाने घातलेले निर्बंध उत्सवांच्या विरोधात नाहीत. उत्सवही साजरा व्हावा आणि नागरिकांनाही त्रास होऊ नये, या संतुलनासाठी ते असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीकडे डीजेला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. गेल्या काही वर्षांत ढोल-ताशा पथकांनी आपल्या वादनामध्ये शिस्त, नवीन ताल आणि कोरिओग्राफी आणली आहे. अनेक पथके नियमांचे पालन करून वादन करत असल्याचेही नमूद करण्यात आले. पुण्यात उत्सवांदरम्यान ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. पोलीस प्रशासनाने कर्णकर्कश डीजे, प्लाझ्मा आणि प्रेशर साऊंडवर निर्बंध कायम ठेवण्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ध्वनीमर्यादा आणि ढोल-ताशा वादनाबाबतही नियमांचे पालन आवश्यक असल्याचे न्यायालयीन निर्देशांमध्ये म्हटले आहे. उत्सवाची परंपरा आणि श्रद्धा जपत, नागरिकांच्या आरोग्याचा व शांततेचा अधिकारही कायम ठेवणे हीच खरी उत्सव संस्कृती आहे, असे मत लोकमान्य टिळक यांचे खापर पणतू रोहित टिळक यांनी व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *