Headlines

Rohit Pawar Questions MPSC Chairman Vivek Bhimanwar Over Paper Leak Row


नीट परीक्षेचा पेपरफुटी प्रकरण ताजे असतानाच एमपीएससीच्या पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. त्यानंतर राज्यात विद्यार्थ्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. आज पुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी मोर्चा काढला. सरकार

.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, ‘वस्तूस्थिती स्पष्ट करुनही सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याने व्यथित असल्याची’ आपली प्रतिक्रिया असल्याचे समजले. ज्या आयोगावर अढळ विश्वास ठेवून 45 लाख विद्यार्थी दिवसरात्र कष्ट करतात आणि आपल्या कार्यकाळात झालेल्या परीक्षेचा पेपर फुटत असेल तर ती आपली नैतिक जबाबदारी नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढे रोहित पवार म्हणाले, “औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचा घटनाक्रम माझ्या रुजू होण्यापूर्वीचा” ही आपली प्रतिक्रिया वस्तुस्थिती आहे का? आपण रुजू होण्यापूर्वी जानेवारीत पेपर फुटला होता तर मार्चमध्ये पेपर घेतलाच का? हे आपलं अपयश नाही का? “पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून MPSC मध्ये अनेक गुणात्मक आणि रचनात्मक सुधारणा केल्याचं आपण म्हणत आहात मग पेपर कसा फुटला?

“तक्रार प्राप्त होताच पोलिसात तक्रार केली” ही आजची आपली प्रतिकिया आहे. जेंव्हा विद्यार्थ्यांनी FDA च्या पेपरफुटीची तक्रार केली तेंव्हा आपली प्रतिक्रिया काय होती? आठवून बघा. “पुरावा नसताना मोघम ई-मेल मिळाला, तक्रारकर्त्याने माघार घेतली, दुसरा तक्रारकर्ता नापास झाला म्हणून त्याने तक्रार केली’’ ही आपली प्रतिक्रिया होती, तेंव्हा तुम्ही आणि तुमचा आयोग तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांवरच कारवाई करायला निघाला होतात, हे आपण विसरलात का? असा प्रश्न रोहित पवारांनी केला आहे.

राहिला विषय तुमच्या कार्यकाळातील सुधारणांचा, तर ऑनलाइन परीक्षा घेण्याची आयडिया कुणाच्या सुपीक डोक्यातली होती? ऑनलाइन घेण्यामागे काय डाव होता? हे पण सांगा. पुरव्यांबाबत बोलायचं तर FDA पेपरलीकचं जसं भलं मोठं प्रेझेंटेशन केलं होतं तसं भलं मोठं प्रेझेंटेशन लवकरच करणार आहे आणि तेही पुराव्यासकट… त्यामुळं राजीनामा देण्यास विलंब करू नका..! खऱ्या अर्थाने व्यथित झाला असाल तर नैतिकता दाखवा आणि विद्यार्थ्यांना मोकळं करा, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

या संदर्भातील ही देखील बातमी वाचा..

MPSC पेपरफुटी:’…तर एक क्षणही पदावर राहणार नाही’, आरोपांनंतर अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे थेट आव्हान

नीट परीक्षेचा पेपरफुटी प्रकरण ताजे असतानाच एमपीएससीच्या पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. त्यानंतर राज्यात विद्यार्थ्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. आज पुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी मोर्चा काढला. सरकारसह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर देखील आरोप करण्यात आले. त्यावर आता भीमनवार यांनी निवेदन देत त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.