![]()
विळद ते सावळीविहीरदरम्यान ५१५ कोटी रुपये खर्चून सुरू असलेल्या नगर–मनमाड महामार्गाच्या कामाला गेल्या १४ महिन्यांपासून अपेक्षित वेग मिळालेला नाही. अहिल्यानगर ते राहुरीदरम्यान बहुतांश ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्याने अवघ्या ३२ किलोमीटरच्या प्रवासासाठी दीड तासापेक्षा अधिक वेळ लागत आहे. नियमित ५५ मिनिटांचा प्रवास कोंडीमुळे त्रासदायक ठरत असल्याने एसटी महामंडळासह खासगी वाहनांनी पर्यायी मार्गांचा आधार घेतला आहे. गेल्या चार दिवसांपासून वाहतूक शेंडी, वांबोरी फाटा, वांबोरी आणि सोनईमार्गे राहुरीकडे वळवली जात आहे. संगमनेरकडे जाणारी वाहने आळेफाटा मार्गाचा वापर करीत आहेत. वांबोरीमार्गे प्रवास केल्यास ११ किलोमीटरचा अतिरिक्त वळसा पडतो. त्यामुळे इंधन खर्च वाढण्याबरोबरच खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे वाढण्याची शक्यता आहे. आठ दिवसांमध्ये डांबरीकरणाचे नियोजन ^अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यासाठी एनएचएआयने जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे. राहुरी फॅक्टरी, सिमेन्स स्टेशन आणि शनिशिंगणापूर फाटा येथील रस्त्यांवर आठ दिवसांत डांबर टाकण्यात येईल. त्यानंतर दिवाळीपासून कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.” -मिलिंद वाबळे, महाव्यवस्थापक, एनएचएआय ग्रामीण रस्त्यांवर ताण वाढण्याची भीती ^ वांबोरीचा रस्ता अरुंद, घाटाचा आणि प्रमुख जिल्हा मार्ग आहे. अतिरिक्त अवजड व प्रवासी वाहतुकीमुळे रस्त्यावर लवकर खड्डे पडून देखभाल खर्च वाढू शकतो. रस्त्याची क्षमता लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन आवश्यक आहे.- एन. डी. कुलकर्णी, निवृत्त अभियंता. विक्रेत्यांच्या व्यवसायात ४० टक्क्यांनी झाली घट विळद–सावळीविहीर हा ७५ किमीचा टप्पा काँक्रीटीकरण व रुंदीकरणासाठी मंजूर आहे. वाहतूक वळवल्याने महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल्स, गॅरेज आणि फळ-भाजीपाला विक्रेत्यांच्या व्यवसायात ३० ते ४० टक्के घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कोंडीचा परिणाम प्रवासापुरता मर्यादित न राहता स्थानिक अर्थव्यवस्थेवरही होत आहे. कोंडीची मुख्य कारणे शहरातील उड्डाणपुलांची कामे : नवनागापूर परिसरातील सह्याद्री चौक आणि सन फार्मा चौक येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने शहरातून बाहेर पडतानाच मोठी कोंडी होते. बायपास रस्त्याची दुरवस्था : शहराबाहेरून जाणारा बायपास मार्ग खड्डेमय झाल्याने पुणे, सोलापूर, कोल्हापूर, बारामतीकडून शिर्डी-नाशिककडे जाणारी वाहने सक्तीने शहरातूनच जात आहेत. दक्षिण भारताचा मुख्य कॉरिडॉर : दक्षिण भारतातून शिर्डी (साईबाबा) व शनिशिंगणापूरकडे येणाऱ्या भाविकांची हजारो वाहने दररोज याच मार्गाने धावतात.
Source link
नगर–मनमाड मार्गावर कामाचा खोळंबा; वाहतूक वांबोरीमार्गे, 11 किमींचा वळसा:राहुरी फॅक्टरी, शनिशिंगणापूर फाटा, सिमेन्स स्टेशन, विद्यापीठ रस्ता वाहतूक काेंडीचे ‘हाॅटस्पाॅट’