Headlines

नांदेडमध्ये भीषण अपघात:ट्रकच्या जोरदार धडकेत टाटा मॅजिकचा चक्काचूर, 5 ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती




नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेड-भोकर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने टाटा मॅजिक या प्रवासी व्हॅनला जोरदार धडक दिली. या अंगावर काटा आणणाऱ्या भीषण अपघातात व्हॅनमधील ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात वाकद गावाजवळील सीताखंडी परिसरात संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. काही जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची प्रशासनाकडून भीती वर्तवली जात आहे. नेमका अपघात कसा झाला? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक भरधाव ट्रक भोकरकडून नांदेडच्या दिशेने वेगात जात होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने १५ प्रवाशांना घेऊन जाणारी टाटा मॅजिक व्हॅन येत होती. सीताखंडीजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताची तीव्रता भयंकर होती. या धडकेत टाटा मॅजिक व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि ती रस्त्याच्या कडेला फेकली गेली. रस्त्यावर रक्ताचा सडा आणि स्थानिकांची धाव ट्रकची धडक बसल्याने व्हॅनमधील ५ प्रवाशांनी जागीच प्राण सोडले. अपघाताचा भयंकर आवाज ऐकून परिसरातील स्थानिक गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्वरित पोलीस आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले. गावकऱ्यांच्या मदतीने ८ गंभीर जखमी प्रवाशांना तत्काळ भोकर आणि नांदेड येथील शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ट्रकचालक केबिनमध्येच अडकला या अपघातात केवळ व्हॅनचेच नव्हे, तर ट्रकच्या समोरील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. धडक इतकी भीषण होती की ट्रकचा पुढचा भाग चेपला गेला आणि ट्रकचालक आतल्या केबिनमध्येच अडकून पडला. त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून आणि नागरिकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या अपघातात मृत्युमुखी पडलेले आणि जखमी झालेले बहुतांश प्रवासी हे स्थानिक रहिवासीच आहेत. त्यामुळे या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. हा अपघात नेमका कुणाच्या चुकीमुळे घडला, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा.. MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा:आठवडाभरात सर्व मागण्या मान्य करण्याचे फडणवीसांचे आश्वासन, पेपर पुनर्तपासणीसह SIT चौकशी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या निकालावरून आणि कथित पेपरफुटीवरून आक्रमक झालेल्या MPSC विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ यांच्यात झालेली महत्त्वपूर्ण बैठक यशस्वी ठरली असून, विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पेपरची पुनर्तपासणी करण्याचे आणि पेपरफुटीच्या प्रकरणाची थेट ‘एसआयटी’ (SIT – विशेष तपास पथक) मार्फत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *