![]()
परदेशातील पर्यटनासाठी विमान प्रवास, हॉटेलचा मुक्काम आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यापेक्षा आता भारतीय पर्यटक क्रूझ पर्यटनाला अधिक पसंती देत आहेत. एकाच तिकिटात प्रवास, निवास, भोजन, मनोरंजन आणि पर्यटनाचा अनुभव मिळत असल्याने हा कल वाढत आहे. विशेषतः मुंबईसारख्या बंदर शहरातून सुरू होणाऱ्या क्रूझमुळे गोवा, लक्षद्वीपपासून थेट आग्नेय आशियापर्यंतचा प्रवास सोयीस्कर झाला आहे. यामुळे पर्यटकांना विमानतळाची धावपळ न करता समुद्रमार्गे पर्यटनाचा नवा पर्याय मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कॉरडेलिया क्रूझेसच्या ताफ्यातील ‘कॉरडेलिया स्काय’ २३ ऑक्टोबरपासून मुंबईहून सफरीला सुरुवात करणार आहे. या जहाजातून दोन रात्रींच्या वीकेंड क्रूझपासून तीन रात्रींची गोवा, चार रात्रींची लक्षद्वीप आणि पाच रात्रींची गोवा-लक्षद्वीप सफर करता येणार आहे. क्रूझ पर्यटनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवासाचे साधन आणि पर्यटनस्थळ यातील सीमारेषा पुसली जाते. जहाज स्वतःच एक पर्यटनस्थळ बनते. २५८ मीटर लांबीच्या कॉरडेलिया स्कायवर १,००२ स्टेटरूम्स असून एकावेळी २,००४ प्रवासी प्रवास करू शकतात. या क्रूझवर १० डायनिंग व्हेन्यू, ११ बार-लाउंज, दोन पूल, पाच हॉट टब आणि ३० हजार चौरस फुटांहून अधिक खुली डेक जागा आहे. याशिवाय फिटनेस सेंटर, स्पा आणि ९३० आसनांचे थिएटर अशी मनोरंजनाची स्वतंत्र व्यवस्थाही उपलब्ध आहे. त्यामुळे पर्यटक केवळ एखाद्या शहराला भेट देत नाहीत, तर प्रवासादरम्यानच सुट्टीचा अनुभव घेऊ शकतात. भारतीय, जैन आणि शाकाहारी भोजनापासून सुशी, इटालियन खाद्यपदार्थांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे विविध वयोगट आणि आवडीनुसार अनुभव घेता येतो. क्रूझचा वाढता आकर्षणाचा आणखी एक पैलू म्हणजे कुटुंबातील प्रत्येकासाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध आहेत. मुलांसाठी उपक्रम, किशोरवयीनांसाठी स्वतंत्र जागा, क्रीडा, पूल, संगीत, लाइव्ह शो आणि गेमिंग यामुळे एकाच कुटुंबातील व्यक्तींना आपापल्या आवडीनुसार वेळ घालवता येतो. मुंबईहून सुरू होणाऱ्या या सफरींच्या पुढे चेन्नईहून फुकेत, लंगकावी, क्वालालंपूर आणि सिंगापूरचा समावेश असलेल्या सात रात्रींच्या आग्नेय आशिया सफरीही प्रस्तावित आहेत. त्यामुळे क्रूझ पर्यटन आता केवळ लक्झरीचा अनुभव न राहता, छोट्या सुट्टीपासून आंतरराष्ट्रीय पर्यटनापर्यंतचा पर्याय बनत आहे. एकाच प्रवासात मुक्काम, भोजन, मनोरंजन आणि अनेक पर्यटनस्थळे यामुळे बदलत्या भारतीय पर्यटकांच्या ‘कमी वेळेत अधिक अनुभव’ या अपेक्षेला क्रूझ पर्यटन पसंतीचे ठरत आहे.
Source link
परदेशवारीपेक्षा आता क्रूझ पर्यटनाला पसंती:मुंबईहून लक्षद्वीप, गोवा आणि आग्नेय आशियापर्यंत सफारी; एकाच तिकिटात प्रवास