Headlines

नामपुरचा वीजपुरवठा दोन दिवसांत सुरळीत करा:अन्यथा ‘ताळे ठोको’, रयत क्रांती संघटनेचा इशारा; वारंवार खंडित वीजपुरठ्याने शेतकरी त्रस्त‎



नामपूर व परिसरातील वीजपुरवठा दोन दिवसांत सुरळीत करून पुरेशा दाबाने वीज उपलब्ध करून द्यावी, अन्यथा महावितरणच्या कार्यालयास ‘ताळे ठोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला आहे. याबाबत संघटनेच्या वतीने नामपूर येथील संबंधित अधिकाऱ्या

.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नामपूर व परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, कमी दाबानेही वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या शेती पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. गेल्या महिनाभरापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांना मका पिकाला विद्युत पंपाद्वारे सिंचन करावे लागत आहे. मात्र, वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने आवश्यक वेळी पिकांना पाणी देता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त सिंचनावर आहे. त्यातच कमी दाबाचा वीजपुरवठा आणि वारंवार वीजखंडित होण्यामुळे विद्युत पंप सुरू करण्यात अडथळे येत आहेत. परिणामी, उभी पिके पाण्याअभावी धोक्यात आली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड, कमी दाब आणि वारंवार होणाऱ्या वीजखंडित होण्याच्या प्रकारांची तातडीने तपासणी करून आवश्यक तांत्रिक दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच शेतीसाठी आवश्यक कालावधीत नियोजित वेळेनुसार पुरेशा दाबाने वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही केली . निवेदनावर रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, केदा पगार, पुंजाराम पगार, निंबा कापडणीस, हेमंत पगार, देवेंद्र पगार, शिवराम भामरे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी वीज वितरण विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका रयत क्रांती संघटनेने घेतली आहे. येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन संबंधित कार्यालयासमोर लोकशाही व सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. आंदोलनादरम्यान उद्भवणारी परिस्थिती आणि वीजअभावी होणाऱ्या आर्थिक नुकसानीची संपूर्ण जबाबदारी वीज वितरण विभागाचीच राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *