![]()
विसापूर आश्रमशाळेतील दुसरीची विद्यार्थिनी सृष्टी सूर्यवंशी (८) हिचा संशयास्पद मृत्यू झाला. सेंट्रल किचनमधील शिळ्या जेवणातून विषबाधा झाल्याचा आरोप कुटुंबाने केला. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याने विस्तार अधिकारी भगवान निकम, अधीक्षिका स्मिता गायकवाड व प्रभारी मुख्याध्यापक सुनील पवार यांना निलंबित केले. गुरुवारी ताप आल्याने सृष्टीला मुकभणगी आरोग्य केंद्रात नेले होते. रात्री जेवणानंतर उलट्या होऊन मध्यरात्री तिचा मृत्यू झाला. राज्यभरातील आश्रमशाळांमध्ये २ वर्षांत ५९४ विद्यार्थ्यांचे बळी गेले असून, नाशिकमधील हा महिन्यातील दुसरा मृत्यू आहे. आदिवासी संघटनांनी सेंट्रल किचनवर बंदीची मागणी केली आहे. पहाटे ३ वाजता बनवलेले जेवण दुपारी मिळते. त्यामुळे विषबाधेचा संशय अस व्यक्त करण्यात आला आहे. मात्र मृत्यू नेमका कुठे झाला याचा तपास करू. शाळेतील जेवण व पाण्याचे नमुनेही तपासले जातील, असे पोलिस आयुक्त लीना बनसोड म्हणाल्या.
Source link
नाशिक जिल्ह्यात आश्रमशाळेतील दुसरीच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू:विस्तार अधिकारी, अधीक्षिका व प्रभारी मुख्याध्यापक निलंबित