Headlines

नाशिक, पालघर जिल्ह्यांत सलग 7 व्या दिवशी भूकंप:नाशकात 3.0, तर पालघरला 3.5 तीव्रतेचा धक्का




नाशिक व पालघर जिल्ह्यांत शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. गत सातव्या दिवसातील हा १२ वा भूकंप होता. नाशिकला ३१ जुलै रोजी पहाटे ३.० तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदू दिंडोरी येथे भूगर्भात ७ किमी खोलीवर होता. दुसरीकडे, पालघर जिल्ह्याला सायंकाळी ४.४७ वाजून ४५ सेकंदांनी ३.५ रिश्टर स्केचा धक्का बसला. केंद्रीय समिती सोमवारी कळवणला देणार भेट नाशिकच्या कळवण तालुक्यातील दळवट परिसर आणि सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा परिसरात २५, २६ आणि २८ जुलै रोजी सौम्य भूकंप झाले. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ३) केंद्र सरकारची तांत्रिक समिती या परिसरातील भूकंपप्रवण क्षेत्राला भेट देत भूकंपाची कारणे, भूगर्भीय स्थिती आणि पुढील उपाययोजनांचा आढावा घेणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *