![]()
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवार, १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ते सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे स्मारकाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण ते करणार आहे. दुसरीकडे, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने शाह यांच्या दौऱ्यावेळी आंदोलनाची घोषणा केली आहे. शाह सकाळी ११.२५ वाजता सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाला भेट देणार आहेत. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना शाह यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार देण्याचा कार्यक्रम टिळक विद्यापीठाने आयोजित केला आहे या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
Source link
अमित शाह आज पुणे दौऱ्यावर:काँग्रेसकडून निषेध आंदोलन