Headlines

1,135 विद्यार्थ्यांची फटाकेमुक्त दिवाळी प्रतिज्ञा:चांदवडच्या जैन विद्यालयातील हरित सेना विभागाचा उपक्रम




चांदवड ‘दिवाळी दिव्यांची, नाही फटाक्यांची…’ असा संदेश देत चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयातील १,१३५ विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. विद्यालयाच्या हरित सेना विभागातर्फे आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणसंरक्षणाचा संदेश दिला, अशी माहिती प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली. कार्यक्रमात हरित सेना प्रमुख रोशन नेरकर यांनी विद्यार्थ्यांना फटाक्यांचे दुष्परिणाम समजावून सांगितले. फटाक्यांच्या धुरामुळे आणि आवाजामुळे मुके प्राणी, पक्षी, लहान मुले व वृद्धांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येकाने वसुंधरेचे सौंदर्य टिकवण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी विद्यार्थ्यांनी ‘फटाक्यांचा पैसा वाचवू, गरजूंना मदत करू’ आणि ‘फटाके नाही, दिवा लावा… प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा’ अशा घोषणा देत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला. या उपक्रमाचे नियोजन उपप्राचार्य देवेंद्रराज जैन व पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हरित सेना प्रमुख रोशन नेरकर यांनी केले. या उपक्रमासाठी संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख आणि रवींद्र आबड आदींनी मार्गदर्शन केले. चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयात आयोजित कार्यक्रमात शिक्षकांच्या उपस्थितीत ‘फटाकेमुक्त व प्रदूषणमुक्त दिवाळी’ची सामूहिक शपथ घेताना विद्यार्थी व शिक्षक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *