Headlines

7 IIT मध्ये SC-ST-OBC समुदायाचे फक्त 18% प्राध्यापक:49.5% पदे आरक्षित; याच वर्षी IIT मुंबईत जातीय भेदभावाचे झाले आरोप




देशातील सात आयआयटींमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील केवळ १८% प्राध्यापक आहेत. या प्रवर्गांसाठी एकूण ४९.५% पदे राखीव आहेत हे विशेष. आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी प्रणव जीवन पी. यांना आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी खरगपूरची स्थिती सर्वांत खराब आहे. येथे ७८१ प्राध्यापकांपैकी या प्रवर्गांतील केवळ ६८ म्हणजेच ८.७% प्राध्यापक आहेत. केंद्रीय शैक्षणिक संस्था अधिनियम, २०१९ अंतर्गत प्राध्यापकांची १५% पदे एससी, ७.५% एसटी आणि २७% ओबीसींसाठी राखीव आहेत. असे असूनही संस्थांमध्ये या प्रवर्गांचे प्रतिनिधित्व कमी आहे. १८ सप्टेंबर रोजी आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याने आत्महत्या केल्यानंतर संस्थेवर जातीय भेदभावाचे आरोप झाले होते. साहिलचे वडील रवींद्र यांनी आरोप केला की, त्यांच्या मुलाला संस्थेत वारंवार जातीय भेदभावाला सामोरे जावे लागले. उमेदवारांचा तुटवडा नाही विशेष बाब म्हणजे उमेदवारांची कमतरताही नाही. आयआयटी खरगपूरमध्ये 2025 पासून प्राप्त झालेल्या शिक्षक भरतीच्या 48% अर्जदारांचा संबंध याच वर्गांशी आहे. आयआयटी पात्र उमेदवार मिळत नसल्याचे कारण देऊन आरक्षित पदे भरत नसल्याचा आरोप आहे. आयआयटी खरगपूरमध्ये 1,136 विद्यार्थ्यांसाठी केवळ एक मानसिक आरोग्य तज्ज्ञ आहे. यूजीसीच्या मानकांनुसार, प्रत्येक 500 विद्यार्थ्यांमागे एक तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. आयआयटी मुंबईत यावर्षी 3 आत्महत्या साहिलचा मृत्यू या वर्षी IIT बॉम्बेमधील तिसरे प्रकरण आहे, तर देशातील IITमध्ये हे नववे प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. ग्लोबल IIT अल्युमनाई सपोर्ट ग्रुपच्या मते, गेल्या 20 वर्षांत IITच्या एकूण 160 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *