![]()
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य कोणत्याही एका जाती-धर्मापुरते मर्यादित नव्हते, तर ते सर्व समाजाच्या कल्याणासाठी होते. ज्या पुण्यभूमीत राजमाता जिजाऊंनी शेतीच्या नांगरातून परिवर्तनाचा विचार रुजवला, त्याच पुण्यात सावित्रीबाई फुले यांनी स्त
.
ते माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथे माळी शुगर फॅक्टरी, महात्मा फुले पतसंस्था, शुगर केन सोसायटी आणि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी यांच्या विद्यमाने आयोजित ‘महात्मा फुले व सावित्रीबाई फुले विचारांचा मुक्त संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी डॉ. कोल्हे म्हणाले, फुले दाम्पत्याचा विचार माळीनगरच्या मातीत रुजलेला आहेच, तो वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.
या वेळी माळी शुगरचे चेअरमन मोहन लांडे, व्यवस्थापकीय संचालक गणेश इनामके, माजी चेअरमन तथा महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे, एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश जाधव, सचिव नीलेश बोरावके, खजिनदार कल्पेश पांढरे, शुगर केन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे आदी उपस्थित होते.
अमोल कोल्हे यांना त्यांचेच रेखाचित्र दिले भेट मॉडेल हायस्कूलच्या कलाशिक्षिका रजनी चौरे आणि शुगर केन सोसायटीचे संचालक जयवंत चौरे यांनी डॉ. अमोल कोल्हे यांचे रेखाटलेले व्यक्तिचित्र भेट देऊन त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिक, शिक्षक, विद्यार्थी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.