![]()
सोमवारचा दिवस… सकाळी अकरापासून सहा मजली जिल्हा न्यायालयात सुनावण्या व काम सुरू होते. मात्र, दुपारी १२.४५ च्या सुमारास न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी येताच खळबळ उडाली. पोलिसांनी बीडीडीएस पथकाला पाचारण केले. न्यायालय परिसर रिकामा करून दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत इमारतीचा कानाकोपरा तपासला. या वेळी काहीही संशयास्पद आढळले नाही; मात्र या धमकीमुळे दुपारी एकनंतर न्यायालयाचे कामकाज ठप्प झाले. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स. ११ वा. न्यायालयाचे काम सुरू झाले होते. सहा मजली इमारतीतील विविध न्यायालयांत सुनावण्या सुरू असतानाच धमकीचा ई-मेल आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस उपायुक्त शाम घुगे, यशवंत सोळंके यांच्यासह पोलिस बंदोबस्त न्यायालय परिसरात दाखल झाला. पोलिस आयुक्त राकेश ओला यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत न्यायालय इमारतीची तपासणी केली. इमारतीतील प्रत्येक मजल्यावरील न्यायालयीन दालने, कपाटे, स्वच्छतागृहे, डस्टबिन, बगीचा, परिसरातील कानाकोपऱ्याची पाहणी केली. अग्निशमन दलाचे वाहनही घटनास्थळी तैनात होते. मात्र, चार तासांच्या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. विशेष म्हणजे, राज्यातील बीड, रत्नागिरी, सांगलीसह अन्य काही ठिकाणच्या न्यायालयांनाही बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या सोमवारीच मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या ई-मेलमागे कोणाचा हात आहे, हा एखाद्या संघटित प्रकाराचा भाग आहे की खोडसाळपणा, याचा पोलिस तपास करीत आहेत. धमकीचा ई-मेल नेमका कुठून आणि कोणी पाठवला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. दरम्यान उद्या कामकाज सुरळीत सुरू होणार आहे. धमकीचा ईमेल न्यायालयीन कर्मचाऱ्यांना दिसताच त्यांनी तत्काळ वरिष्ठांसह पोलिसांना माहिती दिली. संशयास्पद किंवा काहीही आक्षेपार्ह आढळले नाही ^धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. बीडीडीएस पथकाने बगीच्यासह न्यायालय इमारत आणि प्रत्येक ठिकाणची कसून तपासणी केली. या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. – श्याम घुगे, पोलिस उपायुक्त
Source link
बॉम्बच्या धमकीमुळे न्यायालयाचे कामकाज चार तास ठप्प:बीडीडीएस पथकाकडून चार तास तपासणी; संशयास्पद वस्तू आढळली ना