Headlines

आत्मबल अन् शुद्ध आचरण हेच मानवाच्या यशस्वी जीवनाचे सूत्र!:धर्मसभेत केदारपीठाचे जगद्गुरू रावल भीमाशंकरलिंग शिवाचार्य यांचे मार्गदर्शन



भारतीय संस्कृतीत गुरूंना सर्वोच्च स्थान आहे. आई-वडील जन्म देतात; मात्र जीवन कसे जगावे आणि उत्तम माणूस कसे बनावे, हे गुरू शिकवतात. शिवाचार्यरत्न श्री ष.ब्र. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचे धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अ

.

अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बुद्रुक येथील श्री संस्थान हिरेमठ यांच्या वतीने आयोजित जगद्गुरूंचा अड्डपालखी महोत्सव आणि धर्मसभा शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य नेतृत्वाखाली भक्तिमय वातावरणात पार पडली. यानिमित्त आयोजित धर्मसभेत रावल भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी बोलत होते. जीवनातील सर्व बलांमध्ये आत्मबल सर्वश्रेष्ठ आहे. कोणताही काळ वाईट नसतो; आपले विचार आणि आचरण उत्तम असणे महत्त्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण सुंदर बनविण्यासाठी मनाची श्रीमंती आणि शुद्ध आचरण आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सकाळी दहा वाजता एसटी बसस्थानकापासून जगद्गुरूंच्या अड्डपालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. ‘जगद्गुरू पंचाचार्य महाराज की जय’च्या जयघोषात हजारो महिला डोक्यावर कुंभ-कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. पुरवंत, भजनपथके आणि वाद्यवृंदाच्या गजरात गावातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित शिवाचार्यांनी मस्तकावर कुंभ-कलश धारण करून मिरवणुकीत सहभाग घेतल्याचे दृश्य लक्षवेधी ठरले. महोत्सवादरम्यान दररोज श्री सिद्धयोगी सिद्धमल्लेश्वरांच्या पवित्र गादीस रुद्राभिषेक आणि महामंगलारतीचे धार्मिक विधी पार पडले. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या श्री वीरभद्रेश्वर महापुराणाचे निरूपण श्री महातेश हिरेमठ यांनी रसाळ वाणीतून केले. शिवरुद्रय्या हिरेमठ यांच्या संगीताची, तर अशोक आळंद यांच्या तबल्याची साथ लाभली. पुराण आणि भजनसेवेमुळे भाविक भक्तिरसात तल्लीन झाले. उद्योजक निसार शेख यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

सकारात्मक दृष्टिकोनात जीवन जगा! मानवी जीवनात अनेक अडचणी, संकटे आणि संभ्रम निर्माण होतात. अशा वेळी योग्य-अयोग्य याचा सारासार विचार करून निर्णय घ्यावेत. भूतकाळातील घडलेल्या गोष्टी विसरून वर्तमानातील परिस्थिती स्वीकारावी. भविष्यात जे घडेल ते चांगल्यासाठीच असेल, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करावी. सत्य, प्रामाणिकपणा, शिस्त आणि करुणा यांसारखी आदर्श मूल्ये आत्मसात करून जीवन जगावे, असे प्रतिपादन शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.

आत्मबल हेच प्रत्येकाच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ बल! जीवनात केवळ बाह्य सामर्थ्यापेक्षा आत्मबल अधिक महत्त्वाचे आहे. मनाची श्रीमंती, शुद्ध विचार आणि उत्तम आचरण यांच्या बळावरच व्यक्तिमत्त्व घडते. जीवनातील प्रत्येक क्षण सकारात्मक विचारांनी सुंदर बनविता येतो. त्यामुळे संकटांमध्येही खचून न जाता आत्मविश्वासाने जीवन जगावे, असा संदेश केदारपीठाचे जगद्गुरू रावल भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *