![]()
जायखेड्यात मुख्य रस्त्यालगत सुरू असलेल्या ५० लाख रुपये खर्चाच्या भुयारी गटारीचे निकृष्ट काम बंद पडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. कामातील त्रुटी दूर करून नव्याने काम सुरू करण्याचे आदेश दिल्याची माहिती कनिष्ठ अभियंता राजेश सातपुते यांनी चार-पाच दिवसां
.
शेतकरी, रहिवासी, महिला आणि शाळकरी मुलांना या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाचा ठेकेदारावर वचक आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाचे पाणी साचण्याची भीती व्यक्त होत असून, अपघाताची शक्यताही वाढली आहे. निकृष्ट साहित्याचा वापर : मूळ अंदाजपत्रकात आरसीसी स्लॅब अनिवार्य असताना ठेकेदाराने जाड खडी व मातीचे पिचिंग केले आहे.
कामात स्टीलचाही वापर केलेला नाही. कमकुवत चेंबर, फुटलेले पाईप : बसवलेले आरसीसी चेंबर लाथ मारताच हलतात आणि फुटतात. तसेच कामात फुटलेल्या पाईपचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. दिवाळीच्या तोंडावर नागरिकांचे हाल : मुख्य रस्त्यालगत उघडी व दुर्गंधीयुक्त गटार असल्याने शाळकरी मुले, महिला, शेतकरी आणि रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. कनिष्ठ अभियंत्यांच्या आश्वासनानंतरही काम सुरू झालेले नाही. दिवाळीपूर्वी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे. अन्यथा नागरिक व शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला जात आहे.
५० लाखांच्या कामात अनागोंदी
प्रशासनाचा वचकच नाही ^ कनिष्ठ अभियंत्यांनी आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कोणतीही कृती झालेली नाही. दिवाळी तोंडावर असताना मुख्य रस्त्यावरील अर्धवट व निकृष्ट कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाचा ठेकेदारावर वचक नसल्याचे यातून स्पष्ट होते. – विकी पवार, नागरिक, जायखेडा