![]()
ग्रामीण रुग्णालयात अधिकाधिक आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन आमदार संजना जाधव यांनी केले. कन्नड ग्रामीण रुग्णालयात नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन आमदार जाध
.
प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या नगराध्यक्षा फरीन जावेद बेग म्हणाल्या की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या शहरांत उपचारासाठी जाणे परवडत नाही. आमदारांच्या पुढाकाराने रुग्णालयात उत्तम सुविधा उपलब्ध होत आहेत.
कार्यक्रमादरम्यान सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. आमदार संजना जाधव यांनी कामकाजाचा आढावा घेत अडचणी जाणून घेतल्या. तसेच चालू महिन्यात तब्बल १२६ प्रसूती यशस्वीरीत्या केल्याबद्दल रुग्णालय टीमचे कौतुक केले. रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देगांवकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार, डॉ. मनीषा गीते, डॉ. सोहेल शेख, डॉ. रुखसार खान, डॉ. सुरेंद्र पवार, डॉ. शुभम राजपूत, दंत शल्यचिकित्सक डॉ. नितीन सरवदे, नगरसेवक अब्दुल जावेद, यासीन खान, आकाश बोलधने, राम पवार, रिजवान शेख यांच्यासह रुग्णालय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण पवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. नितीन सरवदे यांनी मानले.