Headlines

नारी शक्ती सन्मान सोहळ्यात महिलांचा विकसित नगर शहर घडवण्याचा संकल्प:नारी शक्ती सन्मान सोहळ्यात महिलांचा विकसित नगर शहर घडवण्याचा संकल्प




विचार भारतीच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा समारोप ‘नारी शक्ती सन्मान सोहळ्या’ने उत्साहात झाला. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून माजी लष्करी अधिकारी मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी इतिहासातील पराक्रमी महिलांच्या जीवनातील संघर्ष, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेच्या प्रेरणादायी कथा उलगडल्या. आजच्या मातांनी आपल्या मुलींना केवळ प्रिन्सेस बनविण्याऐवजी त्यांच्यात शौर्य, धैर्य आणि स्वाभिमानाचे संस्कार रुजवून त्यांना घडवावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित शेकडो महिलांनी भविष्यात सुसंस्कृत, सांस्कृतिक, स्वच्छ, हरित सुरक्षित अहिल्यानगर करण्यासाठी, तसेच स्वास्थ्यपूर्ण, स्वयंरोजगार युक्त आणि स्वयं अनुशासित अहिल्यानगर होण्यासाठी २०४७ सालच्या विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करताना विकसित अहिल्यानगर घडवू, असा संकल्प केला. महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी नगरसेविका सुप्रिया जाधव, मंदाकिनी गायकवाड, स्नेहा जोशी आदींसह विचार भारतीच्या महिला सदस्या व पदाधिकारी उपस्थित होते. विचार भारतीच्यावतीने मेजर मोहिनी गर्गे यांना विशेष मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शहरातील विविध महिला भजनी मंडळांच्या कार्याचा गौरव मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. महापौर गाडे म्हणाल्या, महिलांमुळेच आज देशाची प्रगती होत आहे. महिलांनी मेजर मोहिनी गर्गे यांच्या कार्याचा आदर्श घेऊन कर्तृत्ववान बनावे, असे आवाहन केले. सुप्रिया जाधव यांनीही शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात नवरात्रोत्सव उपक्रमाचे प्रमुख पुष्कर कुलकर्णी यांनी विचार भारतीच्यावतीने नवरात्रोत्सवात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कश्मीरा जामगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. सानिका वाकळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी भारतीच्या महिला सदस्या रूपाली मोहिते, सुनंदा तागड, मनीषा मुळे, शिवानी गायकवाड, ऐश्वर्या सागडे, दीपाली डीडवाणिया, सुवर्णा नागोरी यांच्यासह अध्यक्ष सुधीर लांडगे, सचिव मनोज झंवर, राजाभाऊ मुळे, दिनेश जोशी, राजेंद्र पाचे, चंद्रकांत तागड, राहुल जामगावकर, अनिकेत कौर, विजय वाकळे, अशोक गायकवाड, डॉ. विक्रम डीडवाणिया, सुनील नागोरी, नितीन थोरात, श्रेयस लहामगे आणि यश निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *