![]()
विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे शारीरिक, मानसिक याबरोबरच सामाजिक दुष्परिणामांची माहिती देऊन व्यसनमुक्त जीवनशैलीचा अंगीकार करावी, अमली पदार्थांचे सेवन टाळण्याचे महत्त्व, व्यसनामुळे आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम, व्यसनापासून दूर राहिल्याने होणारे फायदे तसेच शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी निरोगी जीवनशैली किती आवश्यक आहे, असे आवाहन वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांचे सेवन आणि व्यसनाधीनतेचे वाढते धोके लक्षात घेऊन नशामुक्त अभियानांतर्गत वैराग पोलिसांच्या वतीने वैरागमधील सुवर्णलता गांधी महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. समाजात अमली पदार्थांची विक्री किंवा सेवन होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी पुढे येऊन पोलिसांना कळवावे. यासाठी उपलब्ध हेल्पलाइन क्रमांक, व्हॉट्सॲप ग्रुप तसेच गोपनीय पद्धतीने माहिती देण्याच्या सुविधेबाबतही विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन, रस्ते सुरक्षेचे महत्त्व आणि जबाबदार वाहनचालना याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षण, आरोग्य अन् भविष्याला प्राधान्य द्यावे विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या आहारी न जाता आपले शिक्षण, आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य यांना प्राधान्य द्यावे. स्वतः व्यसनापासून दूर राहण्याबरोबरच आपल्या मित्रपरिवारात आणि समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक कादबाने यांनी केले.
Source link
विद्यार्थ्यांनो, व्यसनमुक्त जीवनशैली अंगीकारा:गांधी महाविद्यालयात व्यवसनमुक्तीबाबत मार्गदर्शन