![]()
शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात काँक्रीटचे प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रवेशद्वाराचे दोन्ही पिलर तयार झाले असून, मंगळवारी (दि.१०) प्रवेशद्वाराच्या वरील भागात सुमारे २० फूट रुंदीचा बीम टाकण्याचे काम सुरू होते. मजुरांनी दिवसभर हा बीम पूर्णपणे काँक्रीटने भरला. मात्र, सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास हे काम अंतिम टप्प्यात असतानाच अचानक सेंट्रिंगसह हा काँक्रीटने भरलेला निर्माणाधीन बीम खाली कोसळला. या दुर्घटनेत चार मजूर जखमी झाले आहेत. मो. ऐफाज (२६), जमीर खान समशेर खान (३५), शेख मुजफ्फर शेख बब्बू (२४) आणि शेख जमीर अशी जखमी झालेल्या मजुरांची नावे आहेत. हे सर्व मजूर नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. रामपुरी कॅम्प मुख्य मार्गावर गेल्या तीन महिन्यांपासून सुमारे २२ फूट उंच आणि २० फूट रुंदीच्या प्रवेशद्वाराचे काम सुरू होते. हे काम आता अंतिम टप्प्यात आले होते. सुमारे २२ फूट उंचीचे दोन्ही बाजूंचे काँक्रीट पिलर उभे राहिले होते. त्यामुळे आज पिलरला वरच्या बाजूने जोडण्यासाठी बीम टाकून प्रवेशद्वाराचे काम पूर्ण केले जात होते. मंगळवारी सकाळपासून सुमारे १२ ते १५ मजूर या ठिकाणी बीममध्ये काँक्रीट भरण्याचे काम करत होते. २२ फूट उंचीवर बीम भरणे सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी मजुरांना उभे राहण्यासाठी तात्पुरती चैली (जुगाड) बांधण्यात आले होते, तसेच बीमला सेंट्रिंग लावण्यात आले होते. दिवसभर काम सुरळीत चालले. मात्र, काम अगदी अंतिम टप्प्यात असताना संपूर्ण बीम काँक्रीट आणि सेंट्रींगसह अचानक खाली कोसळला. यावेळी चैलीवर उभे असलेले मजूर काँक्रीटचा मलबा आणि सेंट्रींगसह आदळला. केवळ पाच ते सहा टोपले काँक्रीट टाकायचे बाकी होते.. प्रवेशद्वाराच्या बीममध्ये काँक्रीट भरण्याचे काम सुरू होते, त्यावेळी सुमारे पाच मजूर चैलीवर उभे राहून काम करत होते. अवघे पाच ते सहा घमिले काँक्रीट भरणे बाकी असतानाच अचानक निर्माणाधीन बीम कोसळला. आम्ही थोडे अंतरावर असल्यामुळे तात्काळ मागे सरकलो आणि वाचलो; मात्र चैलीवर उभे असलेले आमचे चार ते पाच सोबती मलबा, सेंट्रींगसह खाली दबले गेले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आम्ही प्रचंड घाबरलो होतो. प्रत्यक्षदर्शी कामगार. घटनास्थळी नागरिकांची गर्दी; मुख्य मार्ग काही काळ बंद दुर्घटना घडल्यानंतर अवघ्या काही वेळातच घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली. हे प्रवेशद्वार बाबा कॉर्नर ते रामपुरी कॅम्प मार्गे विलासनगरला जोडणाऱ्या मुख्य मार्गालगत उभारले जात आहे. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
Source link
निर्माणाधीन प्रवेशद्वाराचा बीम सेंट्रिंगसह कोसळला; 4 जखमी:रामपुरी कॅम्पमधील घटना; मलब्यात दबलेल्या मजुरांची केली सुटका