Headlines

निसर्ग मित्र मंडळाचा कोजागिरी उत्सव उत्साहात संपन्न:निसर्गभ्रमंती, पक्षी निरीक्षण, निसर्ग खेळ आणि पौर्णिमेच्या चांदण्यात दुग्धपानाचा आनंद




निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने शनिवार, दि. 24 ऑक्टोबर 2026 रोजी जोगेश्वरी, वाळूज एमआयडीसी परिसरातील निसर्ग फार्म हाऊस व ॲग्रो टुरिझम येथे कोजागिरी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. निसर्गाच्या सान्निध्यात आयोजित या कार्यक्रमात मंडळाचे सदस्य व निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या निमित्ताने रामराई तलाव परिसरात निसर्गभ्रमंती आणि पक्षी निरीक्षण करण्यात आले. तलाव परिसरातील पक्ष्यांचे निरीक्षण करताना सहभागी निसर्गप्रेमींना पक्षीजीवन आणि परिसरातील जैवविविधता अनुभवण्याची संधी मिळाली. त्यानंतर आयोजित निसर्ग खेळ आणि उत्स्फूर्त गायनामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. सामूहिक वनभोजनानंतर रात्री पौर्णिमेच्या चांदण्यात दुग्धपान करून कोजागिरी उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास निसर्ग मित्र मंडळाचे सचिव किशोर गठडी यांनी मार्गदर्शन केले. निसर्गभ्रमंती, पक्षी निरीक्षण आणि पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून निसर्गाशी नाते जोडण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. मंडळाच्या विविध उपक्रमांमधून निसर्गप्रेम वाढण्यासोबतच निसर्ग संवर्धन, संरक्षण आणि निसर्गाचा अभ्यास करण्याची वृत्ती सदस्यांमध्ये विकसित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात अर्चना दधापुरे, नीलिमा चौधरी, अनिल मेटकर, संध्या मेटकर, सुनील जाधव, सुभाश्री जाधव, सारिका वाणी, जितेंद्र वाणी, आकाश जोशी, रुचा जोशी, अंजली जोशी, ज्योती भिलेगावकर, ज्योती दासरी, आशा पाटील, सौरभ पाठक, रघुवीर पंडित, सपना पंडित, संगीता खैरनार, गिरीश खैरनार, पुजारी कुटुंबातील सदस्य, वैशाली झालवार, संजय खर्चे, सौ. खर्चे, मधुकर तांदळे, शोभा तांदळे, ओमप्रकाश भारतीया, सौ. भारतीया, मोहन शिखरे, सौ. शिखरे, श्रीमती शिखरे, कविता गठडी, संदीप विष्णू, विष्णू कुटुंबातील सदस्य, सतीश पाटील, वैशाली पाटील, मुकुंद सांगवीकर, सौ. सांगवीकर, महेश पांडुरे, मच्छिंद्र जाधव आणि डॉ. अंजली दीक्षित यांच्यासह अनेक निसर्गप्रेमी सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नागेश देशपांडे, विजय देशपांडे, मोहन शिखरे, सतीश गंगापूरकर, सौरभ पाठक, क्षितिज गठडी आणि श्रावणी गठडी यांनी विशेष परिश्रम घेतले. निसर्गाच्या सान्निध्यात, पौर्णिमेच्या चांदण्यात आणि निसर्गमित्रांच्या सहवासात पार पडलेल्या या कोजागिरी उत्सवामुळे सहभागी सदस्यांना आनंदाचे क्षण अनुभवता आले. निसर्गाशी मैत्री आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *