Headlines

पत्नीशी बोलणाऱ्या मित्रावर पतीकडून जीवघेणा हल्ला:गळ्यावर चाकूने वार, टीव्ही सेंटर परिसरातील विवेकानंद उद्यानात भरदुपारी थरारक घटना



पत्नीसोबत बोलत बसलेल्या तिच्या मित्रावर पतीने मागून येऊन चाकूने गळ्यावर वार केला. एवढ्यावर न थांबता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता पतीने जमिनीवर पडलेला मोठा दगड त्याच्या डोक्यात घालून त्याला जिवे मारण्याचा प्

.

या जीवघेण्या हल्ल्यात विष्णू बिभीषण आवाड (२७, रा. इंदापूर, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. दरम्यान, सिडको पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी विष्णू आवाड आणि आरोपीची पत्नी हे दोघे फलटण येथील एका अकॅडमीमध्ये एकत्र असताना त्यांची ओळख झाली. मंगळवारी (२ जून) सकाळी विष्णू तिला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आला होता. सकाळी ११:३० च्या सुमारास विवाहिता आणि तिचा पती हे दोघे टीव्ही सेंटर परिसरातील स्वामी विवेकानंद गार्डन येथे गेले. तिथे विष्णूसोबत तिघे बोलत बसले होते. अचानक पती उठून पाठीमागे गेला. तो मागून आला. दोघे बोलण्यात मग्न असतानाच त्याने धारदार चाकूने विष्णूच्या गळ्यावर उजव्या बाजूने वार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विष्णूने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त हणमंतने खाली पडलेला मोठा दगड उचलून विष्णूच्या डोक्यात घातला. याप्रकरणी विष्णूचा भाऊ श्रीकृष्ण आवाड (३२) याच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीनेच केला पोलिसांना फोन

गंभीर जखमी विष्णूला विवाहितेने तातडीने रिक्षातून एमजीएम रुग्णालयात दाखल केले. विष्णूच्या गळ्याला गंभीर इजा झाल्याने त्याला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आरोपी पती रुग्णालय परिसरातच घुटमळत असल्याचे पत्नीच्या लक्षात आले. तिने क्षणाचाही विलंब न लावता “डायल ११२’ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. सिडको पोलिसांनी तत्काळ धाव घेत पतीला ताब्यात घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *