Headlines

पशुपक्ष्यांना चिमुकल्यांची साद अन् आजी-आजोबांशी गप्पा!:संगमनेर तालुक्यातील देवकवठे येथील विद्यालयात "मंथ ऑफ काइंडनेस''चा उपक्रम‎




समाजामध्ये सकारात्मकता वाढीस लागावी याकरता कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून जुलै महिना हा मंथ ऑफ काइंडनेस राबवण्यात येत आहे. या अंतर्गत रामाजी गेनुजी पा. कहांडळ विद्यालय देवकवठे येथील विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळ परिसरात व शाळेच्या प्रांगणात पशुपक्ष्यांना चिमण्यांना खाद्य टाकून परत गावाकडे फिरण्याची साद घातली. विद्यार्थ्यांनी मंथ ऑफ काइंडनेस हा अभिनव उपक्रम राबवला. यावेळी मुख्याध्यापक संजय लहारे, शिक्षक शरद शेवंते, ज्ञानदेव गाडेकर, रंगनाथ वारुंगसे, आशा सूर्यवंशी, सुशील गायकवाड, अब्दुल पठाण, राजेंद्र चत्तर, संदीप सोनवणे, मंगेश देसाई आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. डॉ. थोरात यांनी समाजातील कटुता दूर होऊन सहिष्णुता आदरभाव आपुलकी जिव्हाळा वाढावा याकरता जुलै महिना हा मंथ ऑफ काइंडनेस म्हणून राबवण्याचे नियोजित केले. यांतर्गत संगमनेर तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. देवकवठे गावामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील आजी आजोबांबरोबर गप्पा मारणे आईवडिलांना शेतीकामात मदत करणे याचबरोबर घर परिसरात स्वच्छता करणे अशी कामे केली. याचबरोबर या चिमण्यांनो परत फिरा रे या उपक्रमांतर्गत घराच्या प्रांगणात व गावातील परिसरात पशुपक्ष्यांचे वाढ व्हावी याकरता त्यांना धान्य टाकले. कहांडळ विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन विद्यालयाच्या बाजूने असलेल्या घनदाट झाडींच्या भोवती चिमण्या व इतर पाखरांना दाणे टाकले. यावेळी या चिमण्यांनो परत फिरा रे ही साद सर्वांनी घातली. निसर्गाची गाणी गात बालगीते व बडबड गीते गात या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम मोठ्या आनंदाने साजरा केला. कहांडळ विद्यालयाने कायम गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य दिले असून शिक्षणाच्या अद्यावत सुविधा दिल्या आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये देवकवठे ग्रामस्थ व सिन्नर तालुक्यातील मलढोन, येथील विद्यार्थी व ग्रामस्थ यांचाही सहभाग असल्याचे ते म्हणाले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पशुपक्षी आवश्यक मुख्याध्यापक लहारे म्हणाले, ग्रामीण भागामध्ये पूर्वी चिमणी, कावळे यांसह खूप पक्षी असायचे मात्र ग्लोबल वार्मिंगची समस्या, पाण्याचे दुर्भिक्ष आणि रासायनिक खतांचा वापर यामुळे ग्रामीण भागातील अनेक पशुपक्षी कमी झाले आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पशुपक्ष्यांची अत्यंत गरज आहे. मंथ ऑफ काइंडनेस अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पशु पक्षांबद्दल आत्मीयता व जिव्हाळा वाढीसाठी प्रयत्न केला जात आहे.या सर्व उपक्रमांमध्ये देवकवठे ग्रामस्थ व सिन्नर तालुक्यातील मलढोन, येथील विद्यार्थी व ग्रामस्थ यांचाही सहभाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले .



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *