Headlines

पाडव्याच्या मुहूर्तावर पैठणमध्ये 5 कोटी रुपयांची उलाढाल:घराचे स्वप्न, नव्या वाहनाची चाहूल अन् सोन्याची खरेदी; खरेदीमुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधान



दिवाळीचा आनंद, नव्या स्वप्नांची चाहूल आणि शुभमुहूर्तावर खरेदीचा उत्साह, अशा मंगलमय वातावरणात दीपावली पाडव्याच्या स्वागतासाठी पैठण शहरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे. कोणाच्या डोळ्यांत नव्या घराचे स्वप्न आहे, तर कोणाच्या दारात नवे वाहन आणण्याची तयारी. महि

.

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन घर, फ्लॅट आणि प्लॉट तालुक्यातील दोनशेहून अधिक विक्री होणार आहेत. वाहन बाजारातही दुचाकी आणि चारचाकी तीनशेहून अधिक विक्री झाल्या आहेत. आज पाडव्याच्या निमित्तानेदेखील शेकडो वाहने विक्री होतील अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

सराफा बाजारात सोने-चांदीचे दागिने आणि नाणी खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह आहे. सराफ व्यावसायिक बलराम लोळगे म्हणाले, ‘पाडव्याला सोने-चांदी खरेदीला विशेष महत्त्व असून यंदाही चांगल्या व्यवसायाची अपेक्षा आहे. आजच्या पाडव्याच्या मुहूर्तावर अधिक खरेदी होईल असे लोळगे यांनी सांगितले. पैठण शहर व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष पवन लोहिया म्हणाले, ‘घर, प्लॉट, वाहन, सोने-चांदीसह विविध वस्तूंच्या खरेदीमुळे स्थानिक व्यापाराला गती मिळेल. यंदा पाडव्याला सुमारे ५ कोटींची उलाढाल होईल.’ ^ग्राहकांच्या स्वप्नांना, कुटुंबांच्या आनंदाला आणि व्यापाऱ्यांच्या आशांना नवी उमेद देणारा हा पाडवा पैठणच्या अर्थचक्राला गती देणारा ठरणार. आज खरेदी मोठ्या प्रमाणात होईल. या दिवशी जवळपास शहरात ५ कोटींहून अधिक उलाढाल होण्याचा अंदाज आहे. -पवन लोहिया, अध्यक्ष व्यापारी महासंघ, पैठण

अर्थचक्राला गती देणारा ठरणार पैठणचा पाडवा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *