![]()
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक १० नोव्हेंबरला होत आहे. सोमवारी महायुतीच्या नेत्याची बैठक कोल्हापूर डीसीसी बँकेत पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाबाबत मोठी घोषणा केली. पत्रकार परिषद घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाबाबत मोठी घोषणा केली. या वेळी त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली. गोकुळच्या अध्यक्षपदाचा निर्णय महायुतीचे नेतेच घेतील, अध्यक्ष कोण होणार हे आम्ही ठरवू, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. ‘गोकुळ’चा अध्यक्ष महायुतीचा होणार आहे. मात्र, अध्यक्ष कोण असणार याबाबत मंगळवारी सकाळी महायुतीच्या नेत्याची बैठक घेऊन नावाची घोषणा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी झालेल्या बैठकीला महायुतीमधील भाजप, शिवसेनेचे नेतेमंडळी उपस्थित होते. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी कुणाचे नाव जाहीर होते हे मंगळवारी कळणार आहे. उद्या महायुतीचा उमेदवार ठरणार: मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक भाग्यरेषा असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघात ५ शासननियुक्त सदस्य नेमून त्यांना मतदानाचा अधिकार बहाल करणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाविरोधात सोमवारी कोल्हापूरच्या रस्त्यांवर तीव्र संतापाचा भडका उडाला. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या विराट ‘संघर्ष मोर्चा’त शेतकरी आणि दूध उत्पादक हातात कोल्हापुरी पायताण आणि गाई-म्हशींसह रस्त्यावर उतरले. “कोल्हापुरी बाणा पायताण हाणा” आणि “शेतकरी दूध उत्पादक जगवा, लक्षात ठेवलंय २०२९” अशा थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान देणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या मोर्चात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी थेट राज्य सरकारला आव्हान देत, “तुम्ही आमची कळ काढली, आम्ही शांत होतो. आता तुम्ही सुरुवात केली आहे, तर याचा शेवट आम्हीच करणार. याचना नाही, आता थेट रण होणार,’ असा थेट इशारा त्यांनी या वेळी बोलताना दिला. कोल्हापूरसह राज्यभरातून हजारो कार्यकर्ते दाखल दसरा चौकातून सकाळी सुरू झालेला हा मोर्चा ऐतिहासिक ठरला. कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो कार्यकर्ते आणि दूध उत्पादक दाखल झाले होते. आंदोलकांनी जनावरांच्या गळ्यात घोषणांचे फलक अडकवले होते, तर हातात पायताण उंचावून निषेध नोंदवला. मोर्चाचा वाढता दबाव पाहता कोल्हापूर पोलिस दलाने संपूर्ण मार्गावर तगडा बंदोबस्त तैनात केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. त्यानंतर नेत्यांची भाषणे झाली.
Source link
गोकुळमधील सरकारी हस्तक्षेपाविरोधात कोल्हापुरात पायताण अन् जनावरांसह मोर्चा:तुम्ही सुरुवात केली, आम्ही संपवणार; 2029 मध्ये सत्ता उलटवू- सतेज पाटील