![]()
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष निवडीसाठी उद्या (१० नोव्हेंबर) मतदान होत असून, आज केवळ २५ निर्वाचित सदस्यच गोकुळचा राजा कोण हे ठरवणार आहेत. राज्य शासनाच्या अध्यादेशामुळे निर्माण झालेल्या कायदेशीर पेचावर औरंगाबाद खंडपीठाने
.
न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्यासमोर दिवाळी सुट्टीत ही सुनावणी पार पडली. न्यामूर्ती धोटे हे कोल्हापूर खंडपीठातील न्यायमूर्ती आहेत. मात्र ते सध्या संभाजीनगरात सुटीवर आहेत. त्यामुळे सुटीत ते औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी करत आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार अध्यक्ष निवडीची संपूर्ण प्रक्रिया, मतदान आणि मतमोजणी नियमांनुसारच व व्हिडिओग्राफीद्वारे पार पडेल. निकालही जाहीर केला जाईल, मात्र ही संपूर्ण प्रक्रिया २५ नोव्हेंबरच्या पुढील सुनावणीत होणाऱ्या अंतिम निकालाच्या अधीन राहील. समविचारी आघाडीचे अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, शासनाचा अध्यादेश सहकाराशी खेळ असून निवड जुन्या पद्धतीनेच व्हावी. तर शासनाचे वकील मुकुल रोहतगी यांनी, राज्यसभेत नामनिर्देशित सदस्य मतदान करू शकतात, मग इथे का नाही, असा युक्तिवाद केला.
ना विजय ना पराभव
न्यायालयाचा निकाल दोन्ही बाजूंचे समाधान करणारा वाटतो. २५ निर्वाचित संचालकांमध्ये ज्या गटाचे स्पष्ट बहुमत असेल, तिथे या ४ मतांची मोजणीच होणार नाही. बरोबरी झाल्यासच ४ मतांची पेटी उघडली जाईल. तरीही ही निवड अंतिम निकालाच्या अधीन असेल.
व्हर्च्युअल नाकारले, प्रत्यक्ष युक्तिवादानंतरच निर्णय
सुरुवातीला ऑनलाईन सुनावणी घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र, एका बाजूला मुकुल रोहतगी आणि दुसऱ्या बाजूला अभिषेक मनू सिंघवी यांच्यासारखे दिग्गज आमनेसामने असल्याने खंडपीठाने ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष कोर्टातच युक्तिवाद ऐकण्याचा निर्णय घेतला.