![]()
छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाणी पुढील ८ महिने पुरवण्यासाठी शासनातर्फे नोव्हेंबर महिन्यापासून पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सध्या १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याच्या पाणीपुरवठा, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. ‘दैनिक दिव्य मराठी’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्या बोलत होत्या. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी अनेक नगरपालिकांमध्ये १० ते १५ हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची कठोर तरतूद केली असून नागरिकांमध्ये जलसाक्षरता मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लातूर, धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथील संवादानंतर आता जालना, परभणी, हिंगोली व नांदेड येथे हा उपक्रम होणार आहे. महिलांकडून येणाऱ्या महत्त्वाच्या सूचना थेट स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांकडे पाठवून दुष्काळ निवारणाचे सर्वसमावेशक धोरण निश्चित केले जाईल, असेही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी नमूद केले. दुष्काळाच्या या संकटावर मात करण्यासाठी भाजप महिला आघाडीतर्फे नवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र तुळजापूर ते श्री क्षेत्र माहूर असा ‘नारीशक्ती संवाद जागर’ उपक्रम राबवला जात आहे. या मोहिमेअंतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील महिला शेतकरी व ग्रामीण घटकांशी थेट संवाद साधला जात आहे. यामध्ये चाराटंचाई, रोजगारनिर्मिती, जलसाक्षरता आणि बालविवाह रोखण्यासारख्या गंभीर मुद्द्यांवर महिलांकडून सूचना संकलित केल्या जात आहेत. मेघना बोर्डीकर
Source link
पाण्यासाठी नोव्हेंबरपासून कठोरनियोजन; नासाडी करणाऱ्यांवर दंड:मराठवाड्यातील महिलांच्या सूचनांवरून आखणार धोरण- राज्यमंत्री बोर्डीकर