![]()
जिल्ह्यातील प्रकल्प गतवर्षी सप्टेंबरमध्ये १०० टक्क्यांच्या जवळ भरलेले होते. यंदा मात्र पावसाळा अंतिम टप्प्यात असतानाच ११५ मध्यम व लघु प्रकल्पांत अवघा ३२.३८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जुलैमध्ये सरासरीच्या दीडपट पाऊस बरसल्याने जिल्ह्याच्या पावसाच्या हिश
.
सध्या ३२ प्रकल्प निम्म्याखाली, तर १४ प्रकल्प २५ टक्क्यांच्याही आत आहेत. पीकपाणी-चाऱ्याची परिस्थिती तपासून अहवाल सोमवारी शासनाकडे सादर झाला आहे. त्यामुळे आता प्रशासनासमोर खरी परीक्षा अहवालाची नव्हे, तर गतवर्षीच्या जवळपास भरलेल्या प्रकल्पांच्या तुलनेत यंदा हाताशी असलेल्या साठ्यावर हिवाळा पार करून उन्हाळ्यापर्यंत गावांची तहान कशी भागवायची, याची असणार आहे. १५ सप्टेंबरच्या अधिकृत आकडेवारीत हे चित्र स्पष्ट झाले. जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत २९.९५ टक्के, तर ९९ लघु प्रकल्पांत ३४.८८ टक्के उपयुक्त पाणी आहे. Q. उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन कसे होणार आहे? A. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. Q. अनधिकृत पाणी उपशाचे काय, कारवाई होणार का? A. संबंधित यंत्रणांना तो रोखून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. Q. पीकपाणी-चाऱ्याचा अहवाल कुठपर्यंत आहे? A. सर्व माहिती एकत्र करून सोमवारी शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे . Q. पुढील टंचाईसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी काय? A. उपलब्ध साठ्याचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना आहेत. १ जून ते १५ सप्टेंबरदरम्यान अपेक्षित ४९६.४ मिमीच्या तुलनेत ४११.५ मिमी म्हणजे ८२.९ टक्के पाऊस झाला. हा एकटा आकडा पाहिला तर परिस्थितीची तीव्रता जाणवत नाही. याच काळात प्रकल्पांत उपयुक्त पाणी मात्र ३२.३८ टक्के आहे. पीकपाणी-चाऱ्याचे वास्तव जाणून घेण्यासाठी जिल्हा यंत्रणेने माहिती एकत्र करीत अहवाल शासनाकडे पाठवला आहे. त्याच वेळी ३२ प्रकल्प निम्म्याखाली असल्याचे चित्र समोर आहे. निर्णयाकडे लक्ष लागले आहे. विनय गौडा, जिल्हाधिकारी
अहवाल शासनाकडे सादर
पिण्याच्या पाण्यास प्राधान्य
दोन तालुके शंभरीपार; तीन सत्तरीच्या आसपास : जिल्ह्याची एक सरासरी असली तरी तालुक्यांचे वास्तव सारखे नाही. सोयगाव १११.२, सिल्लोड १०१.१ टक्के पाऊस झाला. संभाजीनगर ७०, खुलताबाद ७१.३, तर पैठण ७३.३, वैजापूर ९७.९, फुलंब्री ८८.७, कन्नड ८६.७ आणि गंगापूर ८४.३ टक्क्यांवर आहे.