![]()
अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी मंत्रिपदाबाबत एक मोठे विधान केले आहे. “येत्या काळात मी महाराष्ट्राचा मंत्री म्हणून शपथ घेणार असून, पुढच्या वेळी नरकासूर दहन हे मंत्री म्हणूनच करेन,” असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे. राज्याच्या नेतृत्वाने आपल्याला तसा शब्द दिला असल्याचेही त्यांनी भर कार्यक्रमात ठणकावून सांगितले. त्यांच्या या विधानामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. ‘दोन काकांनी विचारले, मंत्री केव्हा होणार?’ अमरावतीमध्ये आयोजित एका नरकासूर दहनाच्या कार्यक्रमात बोलताना रवी राणा यांनी आपल्या मनातील मंत्रिपदाची सुप्त इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. भाषणादरम्यानचा एक किस्सा सांगताना ते म्हणाले, “मला आता दोन काका भेटले आणि त्यांनी विचारले की, ‘रवीभाऊ तुम्ही मंत्री केव्हा होणार?’ मी म्हटलं, आता बनवतो की काय… पण मी आता या मंचावरून नक्कीच सांगून देतो की, पुढच्या वेळेस नरकासूर दहन हे मंत्री म्हणूनच मी इथे येऊन करीन.” ‘नेत्यांनी मला शब्द दिलाय…’ राज्यातील महायुती सरकारला आणि विशेषतः भाजप नेत्यांना रवी राणा यांचा कायमच भक्कम पाठिंबा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना राणा पुढे म्हणाले, “मला माझ्या नेत्यांवर विश्वास आहे, माझ्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी मला शब्द दिला आहे की, येणाऱ्या काळात या महाराष्ट्राचा मंत्री म्हणून रवी राणा शपथ घेईल.” बडनेरा आणि अमरावतीला न्याय देण्याची ग्वाही मंत्रिपद मिळाल्यानंतर आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी काय करणार, हे सांगताना रवी राणा म्हणाले, “राज्याचा मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने या बडनेरा मतदारसंघाला, अमरावती जिल्ह्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देण्याचे काम मी करीन.” रवी राणा यांनी अतिशय आत्मविश्वासाने मंत्रिपदाचा दावा केल्याने, महायुतीच्या नेत्यांनी खरोखरच त्यांना तसा शब्द दिला आहे का? आणि आगामी काळात त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार का? याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान:शशिकांत पाटील की रणजीतसिंह पाटील? 4 नियुक्त संचालकांची मते सीलबंद ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील आणि रणजीतसिंह पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. यामध्यो कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी, राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अतिरिक्त ४ संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या अध्यादेशावरून निर्माण झालेल्या कायदेशीर पेचावर औरंगाबाद खंडपीठाने अत्यंत महत्त्वाचा अंतरिम निर्णय दिला आहे. सविस्तर वाचा
Source link
पुढच्या वेळी नरकासूर दहन मंत्री म्हणूनच करणार!:रवी राणांचा मोठा दावा, म्हणाले- नेत्यांनी मला शब्द दिलाय