Headlines

बाष्पीभवन रोखण्यासाठी उपायांचा शोध, थंडीचाही घेतला जातो अंदाज:पाणी उन्हाळ्यापर्यंत पुरवण्यासाठी काय करायचे ? प्रश्नावर खल



आगामी उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू नये म्हणून आहे ते पाणी जपणे महत्वाचे आहे. सध्या अमरावती शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याची जपणूक करणे हे जिल्हा प्रशासनासमोरचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी अ

.

बाष्पीभवन रोखण्यासाठी पाण्याच्या वरच्या भागाला पांढरे शुभ्र अंथरुन टाकण्याचा प्रयोग केला जातो. त्यासाठी काही ठिकाणी विशिष्ट रसायन वापरुन धरणातील पाणी आणि सूर्याची किरणे यांच्यात अडथळा निर्माण केला जातो, तर काही ठिकाणी थर्मोकोलच्या शीटस् वापरुन अंथरून तयार केले जाते. अशाप्रकारे बाष्पीभवन रोखले जाते. बाष्पीभवन रोखण्यासाठी थंडीही महत्त्वाची असते. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जलाशयांमधील पाणीसाठासुद्धा मर्यादित आहे. अशा परिस्थितीत कडक ऊन्ह कायम राहिले, तर पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होईल. बाष्पीभवन रोखण्यासाठी आणि पाणीबचत होण्यासाठी यंदा समाधानकारक थंडी पडणेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. यंदा उन्हाळा अन् पावसाळा अशा सलग दोन्ही ऋतूंमध्ये नागरिकांना केवळ उन्हाचाच तडाखा सहन करावा लागला. सलग दोन महिने कडक ”ऑक्टोबर हिट”चा सामना केल्यानंतर आता सर्वांचे लक्ष हिवाळ्याकडे लागले आहे. दिवाळी जवळ आली तरी दिवसभर उन्हाचा चटका कायम असल्याने यंदा खरोखरच गुलाबी थंडी अनुभवायला मिळणार की उन्हे आणखी ताप देणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. येत्या आठवडाभरातही ऑक्टोबर हिटचा चटका असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूण थंडीची तीव्र लाट बऱ्यापैकी कमी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान कडाक्याची थंडी पडणाऱ्या दिवसांची संख्या कमी असेल आणि सरासरीपेक्षा थोडे जास्त किंवा उबदार तापमान राहणार असेल तर बाष्पीभवनाला आळा घालणेसुद्धा अडचणीचे होणार आहे.

विदर्भातील कडक उन हे मुख्य कारण विदर्भातील उच्च तापमान, कडक उन्ह आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मोठ्या जलाशयांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात (मार्च ते जून दरम्यान) पाण्याचे बाष्पीभवन होते. जलविज्ञान आणि सिंचन अभ्यासकांच्या मते, अप्पर वर्धासारख्या विशाल पाणलोट क्षेत्र असलेल्या जलाशयामधून उन्हाळ्याच्या तीव्र हंगामात दररोज लाखो लिटर पाणी केवळ बाष्पीभवनापोटी हवेत उडून जाते. धरणांच्या एकूण साठ्याचा तो लक्षणीय भाग असतो.

मोठ्या धरणांच्या बाबतीत संपूर्ण जलसाठ्यावर आच्छादन करणे कठीण असले, तरी पाण्याचा साठा खालावल्यानंतर आवश्यकतेनुसार लहान क्षेत्रांवर किंवा उपसा केंद्रांच्या परिसरामध्ये तात्पुरत्या स्वरूपात प्लॅस्टिक बॉल्स किंवा अन्य फ्लोटिंग मटेरियलचा वापर करण्याबाबतही तांत्रिक सल्ले घेतले जात आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *