Headlines

Rohit Pawar Cryptic Post Amidst NCP Reunion Buzz; Sharad Pawar Meeting


ज्येष्ठ नेते शरद पवार आजारी असताना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची घेतलेली भेट आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांनी बैठकांचा सपाटा लावला असून, दो

.

रोहित पवारांनी ट्विट करत म्हटलंय की, सत्य हेच तुमचे कर्म असेल, तर अपयशाची हिम्मत नाही तुम्हाला रोखण्याची, ही व्हॉटॲ वर आलेली रचना अत्यंत अर्थपूर्ण, प्रेरक आणि संघर्षाला बळ देणारी आहे. श्रीकृष्णाने म्हटले आहे की, सत्य हेच तुमचे कर्म असेल तर अपयशाची हिमंत नाही तुम्हाला रोखण्याची. प्रत्येक संकट आज नाही तर उद्या संपेल. लोखंड जितके तापते, तितकी ताकद त्यामध्ये येत जाते आणि सोन्याला जितके चटके बसतात, तितके ते अधिक चमकते. हिऱ्याला जेवढी धार लावली, तितका तो उजळतो. सूर्यासारखे चकाकायचे असेल, तर तेवढे काम करावे लागेल आणि नदीसारखा आदर हवा असेल, तर पर्वत सोडून पुढे जावे लागेल.

हे ही वृत्त वाचा

हॉस्पिटलमधील फोटोंचा पक्षांतर्गत राजकारणासाठी वापर करू नका!:पटेलांच्या भेटीवरून रोहित पवारांचा टोला; मुश्रीफांच्या ED क्लोजर रिपोर्टवरही प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्यांसाठी दाखल असताना, अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेली भेट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आलेला फोन यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या सर्व चर्चांवर आमदार रोहित पवार यांनी यवतमाळ मधून सविस्तर खुलासा केला आहे. “पवार साहेब हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. तब्येत खालावल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना जास्त न बोलण्याचा आणि ताण न घेण्याचा सल्ला दिला आहे; म्हणूनच त्यांनी पटेलांना ‘तब्येत बरी होऊ द्या, मग तारखेनंतर बोलू’ असे म्हटले असेल. आजारी माणसाला दुसऱ्या पक्षातील कोणी भेटायला येत असेल तर त्यामागे राजकारण नसते. मात्र, भेटणाऱ्या लोकांनी त्या भेटीच्या फोटो आणि व्हिडिओचा वापर करून आपल्या पक्षांतर्गत राजकारणासाठी वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर ते अजिबात योग्य नाही,” असा सणसणीत टोला रोहित पवारांनी अजित पवार गटाला लगावला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.