![]()
दिवाळी पाडव्यानिमित्त पवार कुटुंबाची एकत्र जमण्याची पूर्वापार परंपरा यंदाही कायम राखण्यात आली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपली मुलं पार्थ, जय आणि सून ऋतुजा यांच्यासह बारामती येथील अजितदादांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली.
कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येत दादांच्या स्मृतींसमोर नतमस्तक होत आदरांजली अर्पण केली. या अत्यंत भावूक क्षणी त्यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे आणि इतर प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते.
आम्ही बारामतीला पंढरी मानतो. इथे रामदास कदम यांचे नाव घेऊन मला या पवित्र जागेचे महत्त्व कमी करायचे नाही, असे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या जर-तरच्या मुद्द्यावर मी काही बोलणार नाही. आम्ही जे काही आहोत, ते अजित पवार आणि शरद पवार यांच्यामुळेच आहोत. माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे; माझ्यावर झालेल्या आरोपांना अजित पवारांच्या स्मृतीस्थळी उत्तर द्यायचे नाही. तसेच, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेट होतच असते, त्याचा वेगळा अर्थ काढून काही फायदा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुनील तटकरे म्हणाले की, राज्याचे अर्थखाते आम्हाला मिळालेच पाहिजे, कारण अजित पवारांनी महाराष्ट्राला विक्रमी अर्थसंकल्प दिले आहेत. त्यांनी सलग 11 अर्थसंकल्प सादर केले आहेत. अर्थखाते आम्हालाच मिळावे, ही आमची ठाम भूमिका आहे. शरद पवारांचे निवासस्थान हे जसे देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहे, तसेच अजित पवारांचे निवासस्थानही राजकीय केंद्रबिंदू राहिले आहे. हे ही वृत्त वाचा
दादांनी विलीनीकरणाच्या 13 बैठकांत तटकरेंना का नेले नाही?:त्यांना DCM बनून राष्ट्रवादी हायजॅक करायची होती; शिवसेना आमदार थोरवेंचा खळबळजनक आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवे भूकंप होत असतानाच, आता शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “27 जानेवारी रोजी अजित दादांचे अपघाती निधन झाले, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल होता. अजित दादांच्या चितेला साधा अग्नीही दिला गेला नव्हता; त्यावेळी सुनील तटकरे 27 आणि 28 तारखेला बारामतीच्या एका हॉटेलमध्ये थांबून राष्ट्रवादीच्या आमदारांना स्वतःकडे येण्यासाठी गुप्त फोन करत होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखाते स्वतःकडे घेऊन संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष हायजॅक करण्याचा त्यांचा कपटी डाव होता,” असा थेट ‘ॲटमबॉम्ब’ महेंद्र थोरवे यांनी फोडला आहे. वाचा सविस्तर
Source link