Headlines

पुणे-अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात:भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल




भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. योगेश शिंदे (वय 35, रा. शिंदे वस्ती, वाडेगाव, ता. हवेली) असे उपचारा दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे अपघात आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी जखमी झाला आहे. याबाबत योगेश शिंदे यांची पत्नी माया (वय 30) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,11 जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास दुचाकीस्वार योगेश शिंदे आणि त्यांचा मित्र अष्टापूर फाट्याकडून वाडेबोल्हाईकडे निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार शिंदे हे गंभीर जखमी झाले. दुचाकीवरील त्यांचा मित्र किरकोळ जखमी झाला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तातडीने घटनेचा पंचनामा केला तसेच शिंदे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस पाटील याबाबत पुढील तपास करत आहेत. ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे मंगळसूत्र हिसकावले दुचाकीस्वार ज्येष्ठ महिलेचे दोन लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना एरंडवणे भागातील पटवर्धन बागेत घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला कर्वेनगरमधील मधुसंचय सोसायटीत राहायला आहेत. त्या एरंडवणे भागातील पटवर्धन बाग परिसरातून दुचाकीवरुन निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे दुचाकीवरुन पसा झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत असून, पोलिस उपनिरीक्षक सूरज राऊत तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *